मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

PUNE NEWS : पुणे जिल्हा दूध संघाच्या चेअरमनपदी अरुण चांभारे बिनविरोध

स्वप्नील ढमढेरे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर निवड

PG
Prashik Ghaste

2 मिनिट वाचन

PUNE NEWS : पुणे जिल्हा दूध संघाच्या चेअरमनपदी अरुण चांभारे बिनविरोध

स्वप्नील ढमढेरे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर निवड

पुणे, महाराष्ट्र मिरर, PUNE NEWS: पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (कात्रज दूध संघ) चेअरमनपदी अखेर अरुण सीताराम चांभारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.PUNE NEWS

संघाचे तत्कालीन चेअरमन ॲड. स्वप्नील बाळासाहेब ढमढेरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने हे महत्त्वाचे पद रिक्त झाले होते. या रिक्त पदासाठी १२ जून २०२६ रोजी कात्रज येथील मुख्य कार्यालयात संचालक मंडळाची विशेष सभा बोलावण्यात आली होती. या सभेत निवडणूक अधिकारी तथा अध्यासी अधिकारी प्रकाश ल. जगताप यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. चेअरमन पदासाठी अरुण सीताराम चांभारे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने, त्यांची या प्रतिष्ठेच्या पदावर बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.PUNE NEWS

अजितदादांचा शब्द सुनेत्रा वहिनींनी पाळला

याप्रसंगी बोलताना नवनिर्वाचित चेअरमन अरुण चांभारे यांनी अत्यंत भावनिक आठवण सांगितली. ते म्हणाले की, "महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांनी मला या दूध संघाचे चेअरमनपद देण्याबाबत शब्द दिला होता. तो शब्द आज महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांनी पूर्ण केला आहे. यासोबतच माजी मंत्री दत्तामामा भरणे, कृषी मंत्री, आ. दिलीपराव वळसे पाटील, आ. दिलीप मोहिते पाटील, आ. ज्ञानेश्वर कटके, आ. सुनील शेळके, आ. शंकरभाऊ मांडेकर, आ. रमेशआप्पा थोरात, आ. सुनील टिंगरे, आ. अतुल बेनके, आ. अशोकबापू पवार यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांनी आणि ज्येष्ठ नेत्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, त्याला मी पूर्णपणे सार्थ ठरवेन,'' असा शब्द त्यांनी दिला.

दूध उत्पादक शेतकऱ्यांचे हित हेच मुख्य प्राधान्य

कात्रज दूध संघाच्या भावी वाटचालीविषयी आणि आपल्या नियोजनाबद्दल बोलताना अरुण चांभारे म्हणाले की, "पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या सर्व संचालक मंडळाला सोबत घेऊन यापुढील काळात संघाची अधिक वेगाने उन्नती आणि प्रगती केली जाईल. ग्रामीण भागातील आणि संपूर्ण जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे अधिकाधिक आर्थिक हित साध्य करणे, हेच माझे मुख्य आणि पहिले प्राधान्य असणार आहे,'' असे त्यांनी आवर्जून नमूद केले.PUNE NEWS

कात्रज मुख्य कार्यालयात सत्कार सोहळा

अरुण चांभारे यांची बिनविरोध निवड घोषित होताच कात्रज येथील मुख्य कार्यालयाच्या प्रांगणात फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेकर, महिला अध्यक्षा कांचनताई ढमाले आणि माजी सभापती सुरेश शिंदे प्रामुख्याने उपस्थित होते.PUNE NEWS

संघाचे सर्व संचालक, अधिकारी, कामगार आणि कर्मचारीवर्ग या सत्कार सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित होता. नवनिर्वाचित चेअरमन यांच्या निवडीमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आणि कामगारवर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

PUNE NEWS

शेअर करा