मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

PUNE NEWS : पुण्यात सोमवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा

धरण साखळीतील पाणीसाठा वेगाने कमी झाल्यामुळे तसेच मान्सून येण्यास विलंब होत असल्याने सर्वपक्षीय बैठकीत घेतला निर्णय

PG
Prashik Ghaste

2 मिनिट वाचन

PUNE NEWS : पुण्यात सोमवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा

धरण साखळीतील पाणीसाठा वेगाने कमी झाल्यामुळे तसेच मान्सून येण्यास विलंब होत असल्याने सर्वपक्षीय बैठकीत घेतला निर्णय

धरण साखळीत सध्या केवळ ५ टीएमसी (१७%) पाणीसाठा शिल्लक
पुढील तीन महिने उपलब्ध पाण्याचा साठा पुरविण्याचे मोठे आव्हान
जलसंपदा विभागाने पुण्याचा पाणीवापर १५ टक्क्यांनी कमी करण्याची सूचना

पुणे PUNE NEWS: शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठा वेगाने कमी झाल्यामुळे पुणे महानगरपालिकेने येत्या सोमवारपासून (१५ जून २०२६) संपूर्ण शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

महापौर मंजूषा नागपूरे आणि पालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत या पाणीकपातीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.PUNE NEWS

पुणे शहरात आगामी काळात उद्भवू शकणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईच्या गंभीर पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेत सर्वपक्षीय नेत्यांची अत्यंत महत्त्वाची आढावा बैठक मंगळवार (दि. ९) पार पडली. या बैठकीत पुण्याच्या धरणांमधील सद्यस्थितीतील उपलब्ध पाणीसाठा, संपूर्ण शहराचा रोजचा पाण्याचा वापर आणि आगामी मान्सूनच्या पावसाची एकूण परिस्थिती यावर अतिशय सविस्तर आढावा घेण्यात आला. मान्सून लांबल्यास किंवा पाणीटंचाईची तीव्रता वाढल्यास पुणेकर नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागू नये, यासाठी पाणी बचतीचे विविध उपाय तातडीने अंमलात आणण्याच्या सूचना यावेळी सर्वानुमते देण्यात आल्या.

या अत्यंत महत्त्वपूर्ण आणि तातडीच्या बैठकीला महापौर मंजुषा दीपक नागपूर, उपमहापौर परशुराम वाडेकर आणि स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच सभागृह नेते गणेश बीडकर, विरोधी पक्षनेते निलेश निकम, काँग्रेस गटनेते रामचंद्र कदम, शिवसेना गटनेते नितीन गावडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते सोपान चव्हाण यांनी देखील या बैठकीत उपस्थित राहून शहरातील पाणी प्रश्नावर विविध महत्त्वपूर्ण उपाययोजना सुचवल्या.PUNE NEWS

प्रशासकीय बाजूने या बैठकीत नवलकिशोर राम, अतिरिक्त महापालिका आयुक्त पवनीत कौर आणि पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांच्यासह पाटबंधारे विभाग आणि पाणीपुरवठा विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत झालेल्या सविस्तर चर्चेनुसार, पाणीपुरवठ्याचे सूक्ष्म नियोजन केले जाणार असून आगामी पावसाळ्याच्या परिस्थितीवर प्रशासन बारीक लक्ष ठेवून आहे.

पाणीकपातीची मुख्य कारणे
खडकवासला धरण साखळीत सध्या केवळ ५ टीएमसी (१७%) पाणीसाठा शिल्लक आहे, जो मागील वर्षाच्या तुलनेत कमी आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, शहरात मान्सून पोहोचण्यास विलंब होत असून पुढील तीन महिने उपलब्ध पाण्याचा साठा पुरविण्याचे मोठे आव्हान पालिकेसमोर आहे. पाण्याच्या वाढत्या वापरामुळे राज्याच्या जलसंपदा विभागाने पुण्याचा पाणीवापर १५ टक्क्यांनी कमी करण्याची सूचना दिली होती. PUNE NEWS

दिवसाआड पाणीपुरवठ्यामुळे पाणी वापरात सुमारे २५% बचत होणे अपेक्षित आहे.

पालिकेने लादलेले कडक निर्बंध
पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी केवळ घरगुती पाणीकपातच नव्हे, तर व्यावसायिक वापरांवरही पुढीलप्रमाणे कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. शहरातील सर्व वाहने धुण्याची केंद्रे पूर्णपणे बंद केली जातील. वाहने धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यास सक्त मनाई असेल. बांधकाम प्रकल्पांसाठी आणि मोठ्या बागांसाठी पिण्याचे पाणी वापरण्यास बंदी असून, तेथे प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरणे बंधनकारक राहील. व्यावसायिक आणि खाजगी स्विमिंग पूलच्या वापरावर कडक निर्बंध असतील.PUNE NEWS

पुढील पावले आणि वेळापत्रक
महानगरपालिका प्रशासनाला पाणी नियोजनासाठी दोन दिवसांचा कालावधी देण्यात आला असून, पुढील दोन दिवसांत कोणत्या भागात कोणत्या दिवशी पाणी येईल याचे सविस्तर वेळापत्रक जाहीर केले जाईल. हा निर्णय पुणे शहरासह दोन्ही कॅन्टोन्मेंट (लष्कर) बोर्डाच्या क्षेत्रांनाही लागू असेल.

PUNE NEWS

शेअर करा