मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

PUNE NEWS : इंदापूर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू

गुणवत्तेनुसार आणि शासनाने निर्धारित केलेल्या आरक्षणानुसार प्रवेश दिला जाणार

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

Maharashtra Mirror

गुणवत्तेनुसार आणि शासनाने निर्धारित केलेल्या आरक्षणानुसार प्रवेश दिला जाणार

पुणे PUNE NEWS: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, इंदापूर येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेला ऑनलाईन पद्धतीने सुरुवात झाली आहे.PUNE NEWS

दुधगंगा दुध डेअरी समोर, जुना अकलूज पुणे बायपास, इंदापूर येथे असलेल्या या वसतिगृहात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती-भटक्या जमाती, आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग, दिव्यांग व अनाथ विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार आणि शासनाने निर्धारित केलेल्या आरक्षणानुसार प्रवेश दिला जाणार आहे. इयत्ता आठवीपासून पुढील शिक्षण घेणारे तसेच कनिष्ठ महाविद्यालय, बिगर व्यावसायिक व व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र आहेत. प्रवेशित विद्यार्थ्यांना विनामूल्य निवास व भोजन, क्रमिक पुस्तके, शैक्षणिक साहित्य, गणवेश, शैक्षणिक सहलीसाठी आर्थिक सहाय्य तसेच दरमहा एक हजार रुपये निर्वाह भत्ता विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो.PUNE NEWS

प्रवेशासाठी अंतिम तारीख
शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी: ३० जून ते ७ जुलै २०२६ तर इयत्ता ११ वी व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी : १५ जुलै ते ३१ जुलै २०२६ पर्यंत प्रवेश घेता येईल.
इच्छुक विद्यार्थ्यांनी गुणपत्रिका, जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, बोनाफाईड प्रमाणपत्र/प्रवेश पावती, आधार कार्ड व रहिवासी प्रमाणपत्र आदी कागदपत्रांसह https://hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन वसतिगृह गृहपाल यांच्याकडून करण्यात आले आहे.

PUNE NEWS

शेअर करा