मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

PUNE NEWS : महात्मा फुले द्विशताब्दी वर्षासह चवदार तळे सत्याग्रह शताब्दीनिमित्त वर्षभर कार्यक्रमांची मेजवानी

पुणे महापालिका करणार आयोजन

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

PUNE NEWS : महात्मा फुले द्विशताब्दी वर्षासह चवदार तळे सत्याग्रह शताब्दीनिमित्त वर्षभर कार्यक्रमांची मेजवानी

पुणे महापालिका करणार आयोजन

पुणे, महाराष्ट्र मिरर, PUNE NEWS: महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त तसेच चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त पुणे महापालिकेच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्याच्या प्रस्तावाला सोमवारी झालेल्या पक्षनेते सभेत मान्यता देण्यात आली.PUNE NEWS

याबाबत उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी सांगितले की, ०५ मे २०२६ रोजी पुणे महानपालिकेत या ऐतिहासिक वर्षानिमित्त भव्य आणि नियोजनबद्ध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी समिती स्थापन करण्याची मागणी केली होती. या मागणीस पक्षनेते सभेने मंजुरी दिली. यावर्षी महात्मा ज्योतिराव फुले यांचे द्विशताब्दी वर्ष देशभर आणि राज्यभर मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहे. तसेच पुणे महापालिकेचे सदस्य म्हणून त्यांच्या कार्याला १५० वर्षे पूर्ण होत असून, सामाजिक समतेच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण चवदार तळे सत्याग्रहालाही १०० वर्षे पूर्ण होत आहेत. महात्मा फुले यांची कर्मभूमी असलेल्या पुण्यात या ऐतिहासिक घटनांचे स्मरण भव्य स्वरूपात व्हावे, या उद्देशाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.PUNE NEWS

या निर्णयामुळे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याचा आणि विचारांचा प्रभावी प्रचार-प्रसार होऊन नव्या पिढीपर्यंत त्यांचा सामाजिक परिवर्तनाचा वारसा अधिक व्यापकपणे पोहोचेल, असा विश्वास उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमांच्या आयोजनासाठी समिती स्थापन करणार

मान्य झालेल्या प्रस्तावानुसार पुणे महापालिकेचे सर्व पदाधिकारी, गटनेते आणि सभासद(नगरसेवक) सदस्यांचा समावेश असलेली समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती संपूर्ण वर्षभराच्या कार्यक्रमांचे नियोजन, समन्वय आणि प्रभावी अंमलबजावणी करेल. समितीवरील दोन सदस्यांची नियुक्ती पक्षनेते सभेमार्फत करण्यात येणार असून, वर्षभर आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांच्या नियोजन व अंमलबजावणीचे अधिकार महापौर यांना प्रदान करण्यात आले आहेत.PUNE NEWS

या कार्यक्रमांचे आयोजन होणार

या उपक्रमांतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रम, शाळा-महाविद्यालयांमध्ये वक्तृत्व, निबंध, चित्रकला व इतर स्पर्धा, विचारप्रबोधनपर व्याख्याने, मिरवणुका, प्रदर्शन, सामाजिक जनजागृती अभियान तसेच महात्मा फुले यांच्या समता, शिक्षण आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचा व्यापक प्रसार करणारे विविध उपक्रम वर्षभर राबविण्यात येणार आहेत.

PUNE NEWS

शेअर करा