मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : नवरात्रोत्सवात दृष्टिहीन महिला उद्योजिकांचे औक्षण; विक्री साहित्य देत स्वावलंबनाला प्रोत्साहन

Pune News पुणे : नवरात्रोत्सवात स्त्रीशक्तीचा जागर होत असताना, केवळ मदतीचा हात देण्यापेक्षा स्वावलंबनासाठी संधी उपलब्ध करून देण्याचा प्रेरणादायी उपक्रम जय गणेश व्यासपीठ, पुणे शहर यांच्या माध्यमातून राबविण्यात आला.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

नवरात्रोत्सवात दृष्टिहीन महिला उद्योजिकांचे औक्षण; विक्री साहित्य देत स्वावलंबनाला प्रोत्साहन
नवरात्रोत्सवात दृष्टिहीन महिला उद्योजिकांचे औक्षण; विक्री साहित्य देत स्वावलंबनाला प्रोत्साहन

Pune News : मदत नको, संधी द्या’ या विचारातून जय गणेश व्यासपीठ व गणेश मंडळांचा स्तुत्य उपक्रम

Pune News पुणे : नवरात्रोत्सवात स्त्रीशक्तीचा जागर होत असताना, केवळ मदतीचा हात देण्यापेक्षा स्वावलंबनासाठी संधी उपलब्ध करून देण्याचा प्रेरणादायी उपक्रम जय गणेश व्यासपीठ, पुणे शहर यांच्या माध्यमातून राबविण्यात आला.https://maharashtramirror.com/ Pune News

पुणे रेल्वे स्थानकासह विविध ठिकाणी चिक्की, अगरबत्ती, धूप-वाती, खेळणी आणि कटलरी यांसारख्या वस्तूंची विक्री करून स्वतःचा उदरनिर्वाह करणाऱ्या नऊ दृष्टिहीन महिला उद्योजिकांना विक्रीसाठी आवश्यक साहित्य देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. सहकार्याचे तोरण बांधत, त्यांच्या कष्टांचा आणि जिद्दीचा गौरव करणारा हा उपक्रम नवरात्रोत्सवातील स्त्रीशक्तीच्या पूजनाचा एक अनोखा आविष्कार ठरला.

बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्ट, अरण्येश्वर येथील एकता मित्र मंडळ आणि भवानी पेठेतील श्री शिवाजी मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. या वेळी सर्व महिला उद्योजिकांना औक्षण करून त्यांचे अनोख्या पद्धतीने पूजन करण्यात आले आणि त्यांच्या व्यवसायाला हातभार लावण्यासाठी विक्री साहित्य वितरित करण्यात आले.

सणांचे खरे मांगल्य केवळ पूजेत नसते, तर समाजातील प्रत्येक घटकाला सन्मानाने जगण्याची संधी देण्यात असते. मदतीपेक्षा स्वावलंबनाला बळ देणारा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचा आणि माणुसकीचा जागर घडवणारा आहे असे मनोगत खटावकर यांनी केले

शिल्पकार विवेक खटावकर, सौ. वैशाली खटावकर, सिद्धेश्वर मंदिराचे विश्वस्त बाळासाहेब पाटोळे आणि कुमार आणवेकर यांच्या हस्ते साहित्याचे वितरण करण्यात आले. या उपक्रमासाठी अद्वैत परिवाराच्या ‘मदत नको, संधी द्या’ या संकल्पनेतून संतोष डिंबळे, सोमनाथ कांबळे, कृष्णा घुले तसेच नगरसेविका शैलजाताई भोसले यांचे विशेष सहकार्य लाभले.

या कार्यक्रमाचे आयोजन पीयूष शाह, प्रल्हाद भाऊ थोरात आणि सुधीर ढमाले यांनी केले. यावेळी नरेंद्र व्यास, ऋत्विक आदमूलवार, गंधाली शाह आणि हेरंब ढमाले उपस्थित होते. पीयूष शाह यांनी प्रास्ताविक केले, तर सुधीर ढमाले यांनी आभार मानले.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा