मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : पुणे मनपा शाळांत दोन कोटींचे सीसीटीव्ही कॅमेरे…

Pune News पुणे: पुणे महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर असतो.

VK
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

पुणे मनपा शाळांत दोन कोटींचे सीसीटीव्ही कॅमेरे…
पुणे मनपा शाळांत दोन कोटींचे सीसीटीव्ही कॅमेरे…

Pune News : मात्र कोणत्या शाळेत किती कॅमेरे याचा स्पष्ट तपशील नाही

Pune News पुणे: पुणे महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर असतो. शाळांच्या आवारात आणि इमारतींमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने अधिक चांगल्या प्रकारे देखरेख ठेवता यावी, या उद्देशाने प्रशासनाने महापालिका शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सुमारे २ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करून तो मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. मात्र, इतका मोठा निधी खर्च करूनही प्रत्यक्ष किती शाळांमध्ये आणि एकूण किती कॅमेरे बसवले जाणार, याचा कोणताही स्पष्ट उल्लेख विषयपत्रात करण्यात आलेला नाही. त्यामुळे पालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

१ कोटी ९९ लाखांच्या निविदेला मान्यता
महापालिका शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा पुरवणे, त्यांची जोडणी करणे आणि ती प्रत्यक्ष सुरू करणे, हे या संपूर्ण प्रकल्पाचे स्वरूप आहे. विद्युत विभागाने तयार केलेल्या पूर्वगणनपत्रकानुसार जीएसटीसह एकूण १ कोटी ९९ लाख ९९ हजार ६३७ रुपयांचे बजेट निश्चित करण्यात आले होते. निविदा प्रक्रियेत सहभागी झालेल्या तीन पात्र ठेकेदारांपैकी आयसेक्युअर आयटी प्रा. लि. यांनी जाहिरात रकमेपेक्षा ०.२२ टक्के कमी दर सादर केला. त्यामुळे जीएसटीसह १,९९,५५,६३७.५४ रुपयांची त्यांची निविदा सर्वात कमी दराची ठरली असून, त्यांना हे काम देण्याची शिफारस प्रशासनाने केली आहे.

प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या मूळ जाहिरातीतील निविदा रक्कम १,६९,४८,८४५ रुपये (अधिक १८% जीएसटी रु. ३०,५०,७९२) अशी होती. आयसेक्युअर आयटीने दर कमी भरल्यामुळे पालिकेचे सुमारे ४४ हजार रुपये वाचल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

सन २०२६-२७ च्या आर्थिक वर्षातील बजेटमध्ये “प्राथमिक शिक्षण… मनपा शाळा इमारतीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा” या अर्थशीर्षकाखाली २ कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध करून देण्यात आली आहे. ४ मे २०२६ मध्ये वित्तीय समितीच्या बैठकीत २ कोटींच्या तरतुदीला वित्तीय मान्यता देण्यात आली. तर १८ जून २०२६ तांत्रिक छाननी समितीने (ठराव क्र. ५२) या कामाच्या पूर्वगणनपत्रकाला तांत्रिक मान्यता दिली.

ठेकेदाराने मान्य केलेल्या स्पेसिफिकेशननुसार काम करून देण्याचे हमीपत्र सादर केले असून, परफॉर्मन्स सिक्युरिटी म्हणून आवश्यक रकमेचा डिमांड ड्राफ्ट पुणे मनपाकडे जमा केला आहे. कामाच्या गुणवत्तेवर दक्षता विभागामार्फत विशेष लक्ष ठेवले जाईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

विद्युत विभागाने तयार केलेल्या आराखड्यानुसार, शाळांमध्ये आधुनिक स्वरूपाची नेटवर्क व्हिडिओ रेकॉर्डिंग यंत्रणा उभारली जाणार आहे. यामध्ये पीव्हीसी वायरिंग, २ कोअर १.५ स्क्वे. एमएम कॉपर वायर, एचडीएमआय केबल्स आणि कॅट-६ नेटवर्किंग केबल, नेटवर्किंग साधने, ऑनलाईन यूपीएस सिस्टीम आणि एलईडी टीव्ही / डिस्प्ले स्क्रीन, सीसीटीव्ही कॅमेरे, नेटवर्क व्हिडिओ रेकॉर्डर आणि तदनुषंगिक विद्युत विषयक कामांचा समावेश आहे. या सर्वाचे नियोजन ठरले असले तरी शाळांची संख्या अस्पष्ट असल्याचे समोर आले आहे.

ठेकेदार कंपनीला वर्क ऑर्डर मिळाल्यापासून करारनामा करून ४ महिन्यांच्या आत संपूर्ण काम पूर्ण करण्याची कडक अट घालण्यात आली आहे. शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि प्रशासकीय देखरेख या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. मात्र, २ कोटी रुपयांचा निधी खर्च होत असताना, शहरात असलेल्या शेकडो मनपा शाळांपैकी 'नेमक्या किती शाळा सुरक्षित होणार?' आणि 'एका शाळेत किती कॅमेरे बसणार?' याचे उत्तर विषयपत्रात गहाळ आहे. पारदर्शकतेच्या दृष्टीने स्थायी समितीच्या बैठकीत यावर लोकप्रतिनिधी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेअर करा