मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : चार ठेकेदारांना महापालिकेची ‘कारणे दाखवा’ नोटीस

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : शहरातील रस्ते स्वच्छतेची जबाबदारी योग्य पद्धतीने पार न पाडणाऱ्या चार प्रमुख ठेकेदारांना पुणे महानगरपालिकेने दणका दिला आहे.

VK
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

चार ठेकेदारांना महापालिकेची ‘कारणे दाखवा’ नोटीस
चार ठेकेदारांना महापालिकेची ‘कारणे दाखवा’ नोटीस

Pune News : स्वच्छतेच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कंत्राटदारांवर कायदेशीर कारवाईचा बडगा

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : शहरातील रस्ते स्वच्छतेची जबाबदारी योग्य पद्धतीने पार न पाडणाऱ्या चार प्रमुख ठेकेदारांना पुणे महानगरपालिकेने दणका दिला आहे. या ठेकेदारांकडून अपेक्षेनुसार झाडकाम होत नसल्याचे निदर्शनास आल्याने महापालिकेने त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावून तत्काळ खुलासा मागविला आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी ही कडक कारवाई केली असून, समाधानकारक उत्तर न मिळाल्यास कंत्राट रद्द करण्यासह काळ्या यादीत टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

महापालिकेच्या वतीने शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी काही महिन्यांपूर्वी नवीन निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. याद्वारे शहरातील विविध भागांमधील रस्ते झाडून स्वच्छ करण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदार संस्थांवर सोपवण्यात आली आहे. झाडकामाची गुणवत्ता उंचावण्यासाठी महापालिकेने तीन महिन्यांच्या कालावधीकरिता प्रायोगिक तत्त्वावर ‘परफॉर्मन्स बेस्ड’ (कामगिरी आधारित) झाडकाम प्रकल्प सुरू केला आहे. मात्र, प्रत्यक्षात काही संस्थांकडून कामात कुचराई होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले.https://maharashtramirror.com/ Pune News

‘कारणे दाखवा’ नोटीस बजावलेल्या ठेकेदार संस्था

ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंट

प्रियंका एंटरप्रायझेस

सिद्धिविनायक एंटरप्रायझेस

सुमित फॅसिलिटीज

अचानक केलेल्या पाहणीत झाली पोलखोल

अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संतोष वारुळे यांनी २ सप्टेंबर रोजी सातारा रस्त्याची प्रत्यक्ष संयुक्त पाहणी केली. या पाहणीदरम्यान रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर ओला कचरा, सुका कचरा तसेच प्लास्टिकचा ढीग साचल्याचे आढळले. तसेच पदपथ, दुभाजक आणि रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणात धूळ, माती व गाळ साचल्याचे निदर्शनास आले. रस्त्याची एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत नियमित व व्यवस्थित स्वच्छता होत नसल्यामुळे वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे हवेत धुळीचे लोट उडत आहेत. यामुळे स्थानिक पातळीवर वायू व धूळ प्रदूषणामध्ये मोठी भर पडत असल्याचा गंभीर आक्षेप महापालिकेने नोटिशीत घेतला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

ही नोटीस सातारा रस्ता, येरवडा-वडगावशेरी, ढोले पाटील रस्ता, शिवाजीनगर-घोले रस्ता, धनकवडी-कात्रज, औंध-बाणेर, हडपसर-मांजरी आणि सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील कामांसाठी बजावण्यात आली आहे. संबंधित ठेकेदारांनी लवकरात लवकर खुलासा सादर करावा, अन्यथा आर्थिक व प्रशासकीय दंड आकारणे, सुरक्षा अनामत रक्कम जप्त करणे, ठेके रद्द करणे आणि संस्थेला कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकण्याची कठोर कारवाई सुरू केली जाईल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

शहरातील रस्ते स्वच्छ राहावेत यासाठी महापालिकेने ठेकेदारांना कंत्राटे दिली आहेत. त्यांनी आपली जबाबदारी गांभीर्याने व योग्य पद्धतीने पार पाडणे बंधनकारक आहे. पाहणीदरम्यान अनेक भागात झाडकाम होत नसल्याचे स्पष्टपणे समोर आल्यामुळेच संबंधितांना नोटीस बजावून खुलासा मागितला आहे. प्रजित नायर , अतिरिक्त आयुक्त, पुणे महानगरपालिका

शेअर करा