मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : पुणे महापालिकेत स्वीकृत नगरसेवकपदासाठी चढाओढ

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे महानगरपालिकेच्या १५ प्रभाग समित्यांमधील स्वीकृत नगरसेवकपदाच्या ४५ जागांवर वर्णी लावण्यासाठी शहरातील राजकीय वातावरण भलतेच तापले आहे.

VK
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

पुणे महापालिकेत स्वीकृत नगरसेवकपदासाठी चढाओढ २२५ पात्र इच्छुक, पण जागा फक्त ४५
पुणे महापालिकेत स्वीकृत नगरसेवकपदासाठी चढाओढ २२५ पात्र इच्छुक, पण जागा फक्त ४५

Pune News : २२५ पात्र इच्छुक, पण जागा फक्त ४५

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे महानगरपालिकेच्या १५ प्रभाग समित्यांमधील स्वीकृत नगरसेवकपदाच्या ४५ जागांवर वर्णी लावण्यासाठी शहरातील राजकीय वातावरण भलतेच तापले आहे. प्रशासनाकडे आलेल्या २९८ अर्जांची अत्यंत कडक छाननी पूर्ण झाली असून, त्यातून २२५ अर्जदार पात्र ठरले आहेत. म्हणजेच एका जागेसाठी सरासरी तब्बल ५ इच्छुकांमध्ये स्पर्धा रंगली आहे. छाननीची ही पहिली फेरी पार पडताच आता सर्वपक्षीय नेत्यांचे उंबरठे झिजवण्यास आणि ‘श्रेष्ठीं’कडे राजकीय फिल्डिंग लावण्यास जोरदार सुरुवात झाली आहे.

निकष कितीही कडक केले तरी…

महापालिकेच्या प्रभाग समित्यांवर बिगर सरकारी व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि तज्ज्ञांना संधी मिळावी यासाठी प्रशासनाने यंदा अर्जांच्या पात्रतेचे निकष अधिक कडक केले होते. राजकीय हस्तक्षेपाला आळा घालणे हा यामागचा मुख्य उद्देश होता; परंतु, अटी कितीही कठीण केल्या तरी राजकीय कार्यकर्त्यांची या पदासाठीची ओढ कमी झालेली नाही. सामाजिक संस्थांचे दाखले, विविध संघटनांची शिफारसपत्रे जोडत बहुतांश पक्षांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी अर्ज भरून बाजी मारण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे प्रशासनाचा सामाजिक प्रतिनिधत्वाचा उद्देश कागदावरच राहतो, की खरोखरच निष्ठावंत आणि तज्ज्ञ कार्यकर्त्यांना संधी मिळते, याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

हडपसर आणि धनकवडीत सर्वाधिक चुरस

प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, अर्जांच्या संख्येत आणि पात्र उमेदवारांच्या यादीत उपनगरांनी बाजी मारली आहे. हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयात सर्वाधिक २८ अर्ज आले होते, ज्यापैकी २७ अर्जदार पात्र ठरले आहेत. धनकवडी-कात्रज-आंबेगाव कार्यालयात २२ पात्र उमेदवारांसह दुसऱ्या क्रमांकावर. तर सिंहगड रस्ता २० पात्र उमेदवार ठरले आहेत. तसेच वारजे-कर्वेनगर आणि कोंढवा-उंड्री प्रत्येकी १९ पात्र उमेदवार ठरले असून कसबा पेठ व कोथरूड मध्यवर्ती व इतर भागांतही चुरस कायम आहे.

निवडणुकांचा हंगाम संपल्यानंतर प्रत्यक्ष प्रभागातून पराभूत झालेल्या किंवा तिकीट न मिळालेल्या पक्षातील वजनदार कार्यकर्त्यांची पुनर्वसन संस्था म्हणून ‘स्वीकृत नगरसेवक’ पदाकडे पाहिले जाते. त्यामुळेच पात्र यादी प्रसिद्ध होताच इच्छुकांनी आपापल्या पक्षाच्या शहराध्यक्षांपासून ते गटनेते आणि आमदारांपर्यंत धावपळ सुरू केली आहे.

पुण्यातील पक्षांतर्गत बलाबल आणि स्थानिक राजकीय समीकरणे लक्षात घेऊन अंतिम ४५ नावांवर मोहोर उमटवली जाईल. "माझे पक्षासाठीचे योगदान" आणि "मागील निवडणुकीत केलेले काम" याचे पाढे वाचत अनेक नेते आता मुंबई-पुण्यातील बड्या नेत्यांच्या बंगल्यांवर फेऱ्या मारत आहेत.

अंतिम ४५ नावांची ‘लॉटरी’ कोणाला?

प्रशासनाने छाननी करून २२५ नावांची यादी खुली केली असली, तरी मुख्य सत्तानाट्य आता सुरू झाले आहे. अंतिम ४५ नावांची निवड करताना पारदर्शकता आणि प्रशासकीय निकष पाळले जाणार की नेहमीप्रमाणे राजकीय ‘वजन’ असणाऱ्यांचीच वर्णी लागणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा