मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : पुणे महापालिकेच्या दिवाळी सुट्टीत बदल; ६ ऐवजी ९ नोव्हेंबरला स्थानिक सुट्टी

Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी २०२६ या वर्षाकरिता घोषित करण्यात आलेल्या अतिरिक्त स्थानिक सुट्ट्यांच्या यादीत प्रशासनाकडून मोठा बदल करण्यात आला आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

पुणे महापालिकेच्या दिवाळी सुट्टीत बदल; ६ ऐवजी ९ नोव्हेंबरला स्थानिक सुट्टी
पुणे महापालिकेच्या दिवाळी सुट्टीत बदल; ६ ऐवजी ९ नोव्हेंबरला स्थानिक सुट्टी

Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी २०२६ या वर्षाकरिता घोषित करण्यात आलेल्या अतिरिक्त स्थानिक सुट्ट्यांच्या यादीत प्रशासनाकडून मोठा बदल करण्यात आला आहे. नवीन परिपत्रकानुसार, शुक्रवारी (६ नोव्हेंबर) धनत्रयोदशीनिमित्त निश्चित केलेली स्थानिक सुट्टी आता रद्द करण्यात आली असून, त्याऐवजी सोमवारी (९ नोव्हेंबर) दिवाळीनिमित्त स्थानिक सुट्टी लागू राहील. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी याबाबतचे सुधारित कार्यालयीन परिपत्रक अधिकृतपणे जारी केले आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. चालू वर्षासाठी पुणे जिल्ह्यातील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांसाठी एकूण तीन अतिरिक्त स्थानिक सुट्ट्या मंजूर करण्यात आल्या होत्या. त्यानुसार महापालिकेनेही आपल्या कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांचे वार्षिक नियोजन केले होते. मात्र, विभागीय आयुक्त स्तरावर स्थानिक सुट्ट्यांच्या यादीत सुधारणा करण्यात आल्यामुळे महापालिकेलाही आपल्या पूर्वीच्या आदेशात सुधारणा करावी लागली आहे.https://maharashtramirror.com/ Pune news

नागरिकांचा सुविधांना प्राधान्य
हा सुधारित आदेश पुणे महानगरपालिकेच्या सर्व प्रशासकीय, मुख्य, क्षेत्रीय व विभागीय कार्यालयांना तातडीने लागू करण्यात आला आहे. परंतु, ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी महापालिकेच्या अत्यावश्यक सेवा या सुट्टीतून पूर्णपणे वगळण्यात आल्या आहेत. यामध्ये शहरातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तांत्रिक कर्मचारी कार्यरत राहतील. आणीबाणीच्या प्रसंगांसाठी अग्निशमन यंत्रणा २४ तास सज्ज असेल. महापालिकेची रुग्णालये, दवाखाने आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष सुरू राहील. शहर स्वच्छतेची कामे व कचरा संकलन पूर्ववत सुरू राहणार आहे.
अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख, परिमंडळांचे उपआयुक्त आणि सहाय्यक आयुक्तांना या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. महापालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना या बदलाची पूर्वकल्पना देऊन कार्यालयीन कामकाजाचे नियोजन त्यानुसार पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या बदलामुळे महापालिका कर्मचाऱ्यांना ऐन दिवाळीच्या काळात प्रशासकीय कामकाजाचा ताळमेळ बसवणे सोपे होणार असून, ९ नोव्हेंबरला सुट्टी मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेअर करा