मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : पुणे मनपात दिवाळी 'सरंजामाला' चाप

Pune News :महत्वाचे मुद्दे *दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विविध व्यक्तींकडून पालिकेत भेटवस्तू वितरीत केले जात असल्याचे अनेक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत *शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी यासंदर्भात एक परिपत्रक जारी केले आहे *यामध्ये कर्मचाऱ्यांना शासकीय सेवा नियमांची आठवण करून देण्यात आली आहे *या नियम

VK
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

पुणे मनपात दिवाळी 'सरंजामाला' चाप
पुणे मनपात दिवाळी 'सरंजामाला' चाप

Pune News : अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मिठाई, सुकामेवा अन् गिफ्ट व्हाऊचर्स स्वीकारण्यास मनाई; मुख्य प्रवेशद्वारावरच भेटवस्तू रोखण्याचे सुरक्षारक्षकांना आदेश

Pune News :महत्वाचे मुद्दे
*दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विविध व्यक्तींकडून पालिकेत भेटवस्तू वितरीत केले जात असल्याचे अनेक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत
*शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी यासंदर्भात एक परिपत्रक जारी केले आहे
*यामध्ये कर्मचाऱ्यांना शासकीय सेवा नियमांची आठवण करून देण्यात आली आहे
*या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असा इशाराही दिला आहेhttps://maharashtramirror.com/ Pune News

Pune News : पुणे, धनश्री ओतारी

Pune News :पुणे महानगरपालिकेत नुकताच एक प्रकार घडला. एक व्यक्ती निळ्या रंगांच्या मोठ्या प्लास्टिक पिशव्यांतून नव्या कोऱ्या प्रवासी ब्यागा महापालिकेतील अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी घेऊन जात असताना एका युटूबरने हा प्रकार चित्रित करून सुरक्षा कर्मचाऱ्यांना त्याची माहिती दिली. नंतर त्या भेटवस्तू जप्त करण्यात आल्या. ही व्हिडिओ क्लिप समाजमाध्यमांवर फिरत होती. असे प्रकार पूर्वीही घडले आहेत.तरीही भेटवस्तू देण्याचा आणि घेण्याचा प्रघात काही थांबत नसल्याचे दिसते आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी मनपाने आता आपल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीच्या काळात भेटवस्तू स्वीकारण्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

मिठाई, फराळ, सुकामेवा, गिफ्ट हॅम्पर, व्हाऊचर्स तसेच रोख रक्कम यांसारख्या कोणत्याही प्रकारच्या भेटी स्वीकारण्यास पालिकेने सक्त मनाई केली आहे. इतकेच नव्हे तर भेटवस्तूंचे बॉक्स किंवा हॅम्पर्स घेऊन पालिकेच्या आवारात प्रवेश करणाऱ्यांना मुख्य प्रवेशद्वारावरच रोखण्याचे स्पष्ट निर्देश सुरक्षा विभागाला देण्यात आले आहेत.

सोशल मीडियावरील व्हिडिओ अन् कारवाईचा बडगा
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना विविध व्यक्तींकडून भेटवस्तू आणि भेटकार्ड वितरीत केले जात असल्याचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमुळे पालिकेच्या अधिकाऱ्यांना अनेक गंभीर आरोप करण्यात येत आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत. शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी यासंदर्भात एक परिपत्रक जारी केले असून, यामध्ये कर्मचाऱ्यांना शासकीय सेवा नियमांची आठवण करून देण्यात आली आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा सज्जड इशाराही देण्यात आला आहे.

परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे की, दिवाळीच्या काळात कंत्राटदार, व्यावसायिक, विकासक, आर्किटेक्ट्स, सल्लागार, पुरवठादार, संस्था आणि सामान्य नागरिक पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देण्याचा प्रयत्न करतात. मात्र, अशा भेटवस्तूंचा स्वीकार केल्याने सार्वजनिक सेवेत अपेक्षित असलेली निष्पक्षता, पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि नैतिक आचरणाचा संकोच होऊ शकतो. महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम १२ आणि महापालिकेस लागू असलेल्या इतर सेवानियमांचा संदर्भ देत, कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने वैयक्तिक अथवा संस्थात्मक पातळीवर अशा प्रकारच्या भेटवस्तू स्वीकारू नयेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

क्षेत्रीय आणि प्रभागीय कार्यालयांनाही नियम लागू
ही बंदी केवळ महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीपुरतीच मर्यादित नसून ती सर्व खातेनिहाय कार्यालये, क्षेत्रीय कार्यालये, प्रभागीय कार्यालये, उपकार्यालये आणि पालिकेच्या नियंत्रणाखाली असलेल्या सर्व वास्तू व परिसरामध्ये कार्यालयीन वेळेत लागू राहील. फराळ, मिठाई किंवा खाद्यपदार्थांच्या स्वरूपात असलेल्या भेटवस्तू स्वीकारण्यासही पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे.

सुरक्षारक्षकांना विशेष सूचना
महापालिकेच्या सुरक्षारक्षकांना सुरक्षा चौकीवरच सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भेटवस्तूंचे बॉक्स, हॅम्पर्स अथवा पाकिटे घेऊन येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला कार्यालयाच्या आवारात प्रवेश करू देऊ नये, असे निर्देश सुरक्षा विभागाला दिले आहेत. त्याचप्रमाणे, सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांना या परिपत्रकाची जाणीव करून द्यावी आणि या नियमांचे तंतोतंत पालन होईल याची खात्री करावी, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन करून भेटवस्तू स्वीकारताना आढळल्यास संबंधितांवर सेवा नियमांनुसार शिस्तभंगाची कठोर कारवाई केली जाईल. हे आदेश तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आले आहेत.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेअर करा