मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune news : पुणे महापालिकेच्या कामचुकार अधिकाऱ्यांना पगार कशासाठी?

Pune news :पुणे: पुणे महानगरपालिकेच्या ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयात आपल्या विविध कामांसाठी येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या मूलभूत सुविधेपासूनही वंचित राहावे लागत असल्याचा धक्कादायक दोन दिवसांपूर्वी समोर आला होता.

VK
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

पुणे महापालिकेच्या कामचुकार अधिकाऱ्यांना पगार कशासाठी?
पुणे महापालिकेच्या कामचुकार अधिकाऱ्यांना पगार कशासाठी?

Pune news : भवन रचना विभागाचा अजब कारभार चव्हाट्यावर

Pune news :पुणे: पुणे महानगरपालिकेच्या ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयात आपल्या विविध कामांसाठी येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या मूलभूत सुविधेपासूनही वंचित राहावे लागत असल्याचा धक्कादायक दोन दिवसांपूर्वी समोर आला होता. सामाजिक कार्यकर्ते रुपेश केसेकर यांच्या पाठपुरवठ्यानंतर पाण्याची सोय झाली; परंतु यानिमित्ताने कामचुकार अधिकाऱ्यांचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

भवन रचना विभागाचे कनिष्ठ अभियंता सुमीत गायकवाड यांची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून निष्काळजीपणा, बेजबाबदारपणा आणि मुजोर वृत्तीमुळे पालिकेची कमालीची नाचक्की झाली आहे. महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा अशा कामचुकार कर्मचाऱ्यांवर आणि अधिकाऱ्यांवर कोणताही वचक राहिला नसल्याचेच या घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे..https://maharashtramirror.com/ Pune News

नेमके प्रकरण काय?
पुणे महापालिकेच्या नियमानुसार प्रत्येक प्रादेशिक किंवा क्षेत्रीय कार्यालयात इमारतींची योग्य निगा राखणे, स्थापत्य कामे पाहणे, वीज व पाण्याच्या जोडण्या सुस्थितीत ठेवणे आणि कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची सुरक्षा व प्राथमिक सुविधांची खातरजमा करणे यासाठी भवन रचना विभागाचा एक स्वतंत्र अभियंता कार्यरत असतो. याच नियमानुसार ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाची सर्व देखभाल-दुरुस्ती व सुरक्षिततेची जबाबदारी कनिष्ठ अभियंता सुमीत गायकवाड यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे. मात्र, ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयामध्ये नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची कोणतीही योग्य सोय उपलब्ध नसल्याची बाब जुलै महिन्यातच समोर आली होती. या संदर्भात एका जागृत नागरिकाने थेट व्हिडिओ शूट करून प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर बोट ठेवले होते. त्यावेळी संबंधित प्रभाग अधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेण्याचे आश्वासन दिले होते, तर विद्युत विभागाच्या अभियंत्यांनी वॉटर कुलर सुरू करण्यासाठी विजेचे कनेक्शन देण्याचे मान्य केले होते. त्यानुसार विद्युत विभागाच्या अभियंत्यांनी गेल्या आठवड्यात "कुलरचे विद्युत काम पूर्ण करून ते चालू केले आहे" असा अहवाल दिला.
यानंतर शुक्रवारी (२३ ऑक्टोबर २०२६) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास तक्रारदाराने प्रत्यक्ष क्षेत्रीय कार्यालयात जाऊन पाहणी केली. त्यावेळी विद्युत विभागाने सुरू केलेला वॉटर कुलर पाण्याशिवाय कोरडाठाक पडलेला दिसला. याबाबत तक्रारदाराने तत्काळ विद्युत अभियंत्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी स्पष्ट केले की, "आमच्या बाजूने विजेचे काम पूर्ण झाले असून विद्युत कनेक्शन ऑन आहे. मात्र, नळाची मुख्य पाणी जोडणी झाली नसल्याने कुलरमध्ये पाणी येत नाही."
पिण्याच्या पाण्याची जोडणी करणे आणि त्यासंबंधी इमारतीची देखभाल पाहणे हे काम मूळचे भवन रचना विभागाचे आहे. त्यामुळे तक्रारदाराने भवन रचना विभागाचे कनिष्ठ अभियंता सुमीत गायकवाड यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, नेहमीप्रमाणे सरकारी कामाच्या मोक्याच्या वेळेत (दुपारी १२ वाजता) अभियंता गायकवाड आपल्या कक्षात उपस्थितच नव्हते.

अधिकाऱ्याची तक्रारदाराला टोलवाटोलवीची उत्तरे
तक्रारदाराने याप्रकरणी अधिकाऱ्याला फोन केली असता संबंधित अधिकाऱ्याने कार्यालयात हजर नसल्याचे स्पष्ट केले. सुरुवातीला साईट व्हिजीट वर असल्याचे सांगणाऱ्या अधिकाऱ्याने, नंतर आपण बाहेर असल्याचे आणि प्रकृती बरी नसल्यामुळे आज ऑफिसला येणार नसल्याचे सांगितले.
धक्कादायक बाब म्हणजे, अधिकाऱ्याने आत्तापर्यंत कोणत्या कोणत्या स्थळाला व्हिजीट केली याची कोणत्याही प्रकारची नोंद नसल्याची माहितीदेखील समोर आली आहे. त्यामुळे अधिकारी नेमकं करतात तरी काय? असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.

सामाजिका कार्यकर्त्यांच्या पाठपुरवठ्याला यश
बेजबाबदार अधिकाऱ्याच्या वर्तनानंतर तक्रारदाराने तत्काळ परिमंडळ २ च्या उपायुक्त श्रीमती आशा राऊत यांच्याशी संपर्क साधला. कार्यालयातील पिण्याच्या पाण्याची दुर्दशा आणि कनिष्ठ अभियंत्याचा निष्काळजीपणा त्यांच्या निदर्शनास आणून दिला. उपायुक्तांनी या प्रकरणाची तातडीने गंभीर दखल घेत आवश्यक सूचना दिल्या. त्यानंतर रविवार, २५ ऑक्टोबर रोजी ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयात अखेर पिण्याच्या पाण्याची जोडणी व दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेअर करा