Pune Crime : एमपीडीए कारवाईतील फरार सराईत गुन्हेगार लक्ष्मीनगर पोलिसांच्या जाळ्यात
Pune Crime : पुणे, महाराष्ट्र मिरर : एमपीडीए (महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डेंजरस अॅक्टिव्हिटीज) कारवाईतील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगाराला लक्ष्मीनगर पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले.
1 मिनिट वाचन

Pune Crime : पुढील कारवाईसाठी खराडी पोलिसांच्या ताब्यात
Pune Crime : पुणे, महाराष्ट्र मिरर : एमपीडीए (महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डेंजरस अॅक्टिव्हिटीज) कारवाईतील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगाराला लक्ष्मीनगर पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले. निखिल मधुकर कांबळे (वय २२, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.https://maharashtramirror.com/ Pune Crime
लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असलेल्या कांबळे याचा शोध घेण्याच्या सूचना वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी तपास पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक निखिल पवार, सहायक पोलीस निरीक्षक सलिमा जसे आणि पोलीस अंमलदार राहुल परदेशी, अक्षय शिंदे व फिरोज बागवान हे परिसरात पेट्रोलिंग करत होते.https://maharashtramirror.com/ Pune Crime
या वेळी गोपनीय बातमीदारामार्फत निखिल कांबळे हा आपल्या मित्राला भेटण्यासाठी खराडी परिसरातील सरगम हॉटेल येथे आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. वरिष्ठांना माहिती देऊन त्यांच्या आदेशानुसार तपास पथकाने संबंधित ठिकाणी धाव घेतली. पोलिसांना पाहताच आरोपीने खोलीच्या खिडकीतून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.
लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात आरोपीच्या अभिलेखाची तपासणी केली असता, तो खराडी पोलीस ठाण्याच्या एमपीडीए कारवाईतील पाहिजे असलेला आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपी निखिल कांबळे याला खराडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, उपायुक्त परिमंडळ-४ आणि संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमर कदम, पोलीस निरीक्षक (दुय्यम) दिलीपकुमार वेडे तसेच तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांनी केली.




