मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : नवरात्रोत्सवामुळे रताळ्यांना मागणी; आवक वाढली, मात्र दरात १० ते २० टक्क्यांची घट पावसाच्या लांबणीचा गुणवत्तेवर परिणाम; मार्केट यार्डात बार्शीच्या रताळ्यांची प्रथमच आवक

Pune News :पुणे : शारदीय नवरात्रोत्सवाला रविवारपासून सुरुवात होत असल्याने उपवासासाठी लागणाऱ्या रताळ्यांना मागणी वाढली आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

नवरात्रोत्सवामुळे रताळ्यांना मागणी; आवक वाढली, मात्र दरात १० ते २० टक्क्यांची घटपावसाच्या लांबणीचा गुणवत्तेवर परिणाम; मार्केट यार्डात बार्शीच्या रताळ्यांची प्रथमच आवक
नवरात्रोत्सवामुळे रताळ्यांना मागणी; आवक वाढली, मात्र दरात १० ते २० टक्क्यांची घटपावसाच्या लांबणीचा गुणवत्तेवर परिणाम; मार्केट यार्डात बार्शीच्या रताळ्यांची प्रथमच आवक

Pune News :पुणे : शारदीय नवरात्रोत्सवाला रविवारपासून सुरुवात होत असल्याने उपवासासाठी लागणाऱ्या रताळ्यांना मागणी वाढली आहे. यामुळे पुण्यातील मार्केट यार्डातील तरकारी विभागात रताळ्यांची आवक वाढू लागली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा आवक अधिक असली, तरी पावसाने दिलेल्या ओढीचा परिणाम रताळ्यांच्या गुणवत्तेवर झाला आहे. परिणामी, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा दरात १० ते २० टक्क्यांची घट झाली आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
मार्केट यार्डात रताळ्यांच्या सुमारे एक हजार ते बाराशे पोत्यांची आवक झाली. एका पोत्यात साधारणतः ४० ते ५० किलो रताळी असतात. घाऊक बाजारात रताळ्यांना दर्जानुसार प्रतिकिलो २० ते ३५ रुपये दर मिळत आहे, अशी माहिती रताळ्यांचे व्यापारी अमोल घुले यांनी दिली. यंदा प्रथमच सोलापूर जिल्ह्यातील बार्शी भागातून रताळ्यांची आवक झाली आहे.
सातारा जिल्ह्यातील कराड आणि कोल्हापूर जिल्ह्यातील मलकापूर येथून येणारी रताळी गावरान असतात. आकाराने लहान, दिसायला आकर्षक आणि चवीला गोड असल्याने या भागातील रताळ्यांना ग्राहकांची अधिक पसंती मिळते. त्यामुळे त्यांना तुलनेने चांगला दर मिळतो. दुसरीकडे, कर्नाटकातून येणारी रताळी आकाराने मोठी आणि दिसायला काहीशी ओबडधोबड असतात. तसेच, चवीला तुरट असल्याने त्यांना तुलनेने कमी मागणी असते.

यंदा बाजारात प्रथमच दाखल झालेली बार्शी येथील रताळी आकर्षक दिसत असून, ग्राहकांची पसंती मिळवत आहेत. नवरात्रोत्सवाच्या काळात रताळ्यांची मागणी कायम राहण्याची अपेक्षा असून, या कालावधीत बाजारात दररोज आवक होणार आहे.

विविध भागांतील रताळ्यांचे घाऊक दर (प्रतिकिलो)
मलकापूर, जि. कोल्हापूर : ३० रुपये
कराड, जि. सातारा : ३० ते ३५ रुपये
बेळगाव, कर्नाटक : २० ते २५ रुपये
बार्शी, जि. सोलापूर : ३० ते ३५ रुपये

“नवरात्रोत्सवामुळे मार्केट यार्डात रताळ्यांची मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे. उत्सवाच्या काळात दररोज रताळ्यांची आवक होणार आहे. यंदा प्रथमच बार्शी भागातून रताळी बाजारात दाखल झाली आहेत.”

— अमोल घुले, अध्यक्ष, श्री शारदा गजानन आडते असोसिएशन

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा