मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : पुण्यात रंगणार ‘पुणे लोकमान्य फेस्टिव्हल’; नवरात्रोत्सवात संस्कृती, कला आणि मनोरंजनाचा जल्लोष

Pune News :पुणे : नवरात्रोत्सवानिमित्त शिवगर्जना प्रतिष्ठान आयोजित ‘पुणे लोकमान्य फेस्टिव्हल – नवरात्र उत्सव २०२६’ चे आयोजन लोकमान्यनगर, जॉगिंग पार्कजवळ, नवी पेठ येथे करण्यात आले आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

पुण्यात रंगणार ‘पुणे लोकमान्य फेस्टिव्हल’; नवरात्रोत्सवात संस्कृती, कला आणि मनोरंजनाचा जल्लोष
पुण्यात रंगणार ‘पुणे लोकमान्य फेस्टिव्हल’; नवरात्रोत्सवात संस्कृती, कला आणि मनोरंजनाचा जल्लोष

Pune News : ११ ते २५ ऑक्टोबरदरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

Pune News :पुणे : नवरात्रोत्सवानिमित्त शिवगर्जना प्रतिष्ठान आयोजित ‘पुणे लोकमान्य फेस्टिव्हल – नवरात्र उत्सव २०२६’चे आयोजन लोकमान्यनगर, जॉगिंग पार्कजवळ, नवी पेठ येथे करण्यात आले आहे. यंदाचे २९ वे वर्ष असून परंपरा आणि आधुनिकतेचा सुरेख समन्वय साधत पुणेकरांसाठी विविध सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल या महोत्सवात पाहायला मिळणार आहे. या महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. गणेश सातपुते, निमंत्रक शुभांगी सातपुते आणि उत्सव अध्यक्ष डॉ. नरेश मित्तल हे आहेत.https://maharashtramirror.com/ Pune News

रविवार, ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता भव्य उद्घाटन सोहळा व देवीची प्राणप्रतिष्ठापना होणार असून शौर्य ढोल-ताशा पथक हे विशेष आकर्षण असणार आहे. त्यानंतर १२ ऑक्टोबरला ‘साई दरबार’, १३ ऑक्टोबरला ‘पाहणं तुम्ही म्हणाल तसं’ लावणी कार्यक्रम, १४ ऑक्टोबरला ‘गीतों का सफर’, तर १५ ऑक्टोबरला लोकप्रिय ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

१६ ऑक्टोबरला महाकाली तांडव नृत्य लाईव्ह शो, १७ ऑक्टोबरला महिलांसाठी ‘रास रिदम गरबा नाईट’, १८ ऑक्टोबरला ग्रुप डान्स/सोलो डान्स स्पर्धा आणि १९ ऑक्टोबरला दांडिया कार्यक्रम होणार आहे. २० ऑक्टोबरला दसऱ्यानिमित्त रावणदहन, तर २५ ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमेनिमित्त ‘टेंशन खल्लास’ हा विशेष कार्यक्रम होणार आहे.

विशेष म्हणजे महोत्सवातील सर्व कार्यक्रम नागरिकांसाठी विनामूल्य ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन पुणे लोकमान्य फेस्टिव्हलच्या वतीने करण्यात आले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा