मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : लोकप्रतिनिधींच्याच सोसायटीत दुर्लक्ष! साचलेल्या पाण्यामुळे लेक टाउनमध्ये आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

महिनाभरापासून बेसमेंट पार्किंगमध्ये पाणी; डासांची उत्पत्ती वाढल्याने रहिवाशांमध्ये चिंता

VK
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

Pune News लोकप्रतिनिधींच्याच सोसायटीत दुर्लक्ष! साचलेल्या पाण्यामुळे लेक टाउनमध्ये आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
लोकप्रतिनिधींच्याच सोसायटीत दुर्लक्ष! साचलेल्या पाण्यामुळे लेक टाउनमध्ये आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

Pune News : महिनाभरापासून बेसमेंट पार्किंगमध्ये पाणी; डासांची उत्पत्ती वाढल्याने रहिवाशांमध्ये चिंता

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आजी-माजी नगरसेवकांचा निवास असलेल्या प्रभागातील पॉश समजल्या जाणाऱ्या ‘लेक टाउन सोसायटी’मध्येच मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाल्याचे समोर आले आहे. गेल्या महिनाभरापासून सोसायटीच्या बेसमेंट पार्किंगमध्ये सातत्याने पाणी वाहत असून, मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती वाढत आहे. त्यामुळे येथील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सोसायटीच्या बेसमेंट पार्किंगमध्ये गेल्या महिन्याभरापासून पाणी साचत असल्याने परिसरात अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सतत वाहणारे आणि साचलेले पाणी वेळेत हटविले जात नसल्याने त्यामध्ये डासांची पैदास होण्यास पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, सोसायटीतील रहिवाशांना डासांचा त्रास सहन करावा लागत असून, आरोग्याच्या दृष्टीनेही ही बाब चिंतेची ठरत आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

पावसाळ्यात पाणी साचण्याच्या समस्येकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहणे अपेक्षित असते. मात्र, गेल्या महिनाभरापासून परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याने रहिवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. बेसमेंट पार्किंगमध्ये साचलेल्या पाण्यामुळे वाहनधारकांनाही त्रास होत असून, परिसरातील स्वच्छता आणि सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत विशेष म्हणजे, याच सोसायटीमध्ये भाजपचे आजी-माजी नगरसेवक राहत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानीच मूलभूत सुविधांशी संबंधित अशी समस्या निर्माण होत असेल, तर सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणींकडे प्रशासन किती गांभीर्याने पाहत असेल, असा सवाल उपस्थित होत आहे. लोकप्रतिनिधींना आपल्या परिसरातील प्रश्नांची जाणीव असताना त्यावर तातडीने उपाययोजना होणे अपेक्षित असल्याची भावना रहिवाशांकडून व्यक्त होत आहे. Pune News https://maharashtramirror.com/

शहरातील विविध भागांमध्ये पावसाळ्यात साचणारे पाणी, नाले-गटारांची समस्या, अस्वच्छता आणि डासांची वाढ यामुळे नागरिक त्रस्त होत असतात. अशा परिस्थितीत प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असते. विशेषतः निवासी सोसायट्यांच्या परिसरात पाणी साचत असल्यास त्याची तातडीने विल्हेवाट लावणे आणि डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी आवश्यक उपाय करणे गरजेचे आहे. लेक टाउनसारख्या उच्चभ्रू आणि लोकप्रतिनिधींचा रहिवास असलेल्या सोसायटीतच महिनाभरापासून पाणी साचून राहणे ही बाब प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. नागरिकांकडून कर आणि विविध प्रकारचे शुल्क आकारले जात असताना त्यांना मूलभूत सुविधा मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र, प्रत्यक्षात समस्या निर्माण झाल्यानंतरही त्यावर तातडीने कार्यवाही होत नसेल, तर नागरिकांनी आपली समस्या मांडायची कुणाकडे, असा प्रश्न निर्माण होतो. https://maharashtramirror.com/ Pune News

दरम्यान, बेसमेंट पार्किंगमधील साचलेले पाणी तातडीने हटवावे, पाण्याचा सतत होणारा प्रवाह थांबविण्यासाठी उपाययोजना करावी आणि डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाय करावेत, अशी मागणी रहिवाशांकडून होत आहे. प्रशासनाने या समस्येकडे केवळ सोसायटीपुरता प्रश्न म्हणून न पाहता नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर बाब म्हणून पाहणे आवश्यक आहे लोकप्रतिनिधींच्या सोसायटीतच मूलभूत सुविधांचा प्रश्न निर्माण झाल्याने या प्रकरणाकडे आता महापालिका प्रशासनाचे लक्ष जाणार का, आणि महिनाभरापासून सुरू असलेल्या या समस्येवर तातडीने तोडगा निघणार का, याकडे लेक टाउनमधील रहिवाशांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा