Pune News : कुराश खेळात प्राविण्य मिळविल्याचे बनावट प्रमाणपत्राव्दारे स्पोर्टस् कोट्यातुन सरकारी नोकऱ्या मिळविण्याचा गैरप्रकार पुणे पोलीसांकडून उघडकीस
Pune News पुणे : "कुराश हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळ असुन तो महाराष्ट्रात सन २०१२ पासुन कुराश असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या क्रिडा संघटनेकडुन खेळला जात आहे.
1 मिनिट वाचन

Pune News पुणे : "कुराश हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळ असुन तो महाराष्ट्रात सन २०१२ पासुन कुराश असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या क्रिडा संघटनेकडुन खेळला जात आहे. त्याच्या विविध ठिकाणी स्पर्धा आयोजित केल्या जातात. अशा कुराश या खेळाच्या राज्यस्तरीय स्पर्धा न होता त्या स्पर्धा झाल्याचे दाखवुन प्राविण्य प्रमाणपत्र वाटप केली जात आहेत व त्याआधारे शासकिय नोकरीत खेळाडुचे ५ टक्के आरक्षण मिळविले जात आहे". अशा आशयाचा गोपनीय अर्ज प्राप्त झाला होता.https://maharashtramirror.com/ Pune News
सदर अर्ज चौकशीत असे आढळुन आले की, सन २०१६ ते २०१९ या कालावधीतील स्पर्धा या भारतीय कुराश असोसिएशनशी संलग्न नसलेल्या असोसिएशनने घेतल्या आहेत व त्यांचे सर्टिफिकेटवर सह्या देखील स्कॅन करुन टाकल्या आहेत. तसेच सन २०१६ ते २०२२ या कालावधीतील स्पर्धा झालेबाबत रेकॉर्ड तयार करण्यासाठी महाराष्ट्र कुराश असोसिएशनचे अध्यक्ष, सचिव यांनी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा संघटनांकडुन मागील ९-१० वर्षापुर्वीच्या तारखेचे खोटे पार्टिसिपेशन लेटर बनवुन घेतले व त्याआधारे क्रिडा संचालनालयाकडे बनावट कागदपत्रे सादर करुन त्यांनी स्पर्धा न घेता इसमांना वाटलेल्या बनावट प्रमाणपत्रांची सत्य व वैध पडताळणी करुन घेतले. त्यामुळे बनावट खेळाडुंना ५ टक्के आरक्षण मिळुन खऱ्या खेळाडुंवर अन्याय झाला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
सदर बाबत शिवाजीनगर पोलीस स्टेशन पुणे शहर येथे गु.र.नं.२३७/२०२६ भा.न्या.सं.क. ३१८(४),३३८,३३६(३),३४० (२), ३३९,६१(२),३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल असुन त्यामध्ये इसम नामे १) शिवाजी जयवंत साळुंखे, वय ४६ वर्षे, रा. फुरसुंगी हडपसर पुणे व पुंगावकर मळा कोल्हापुर २) अंकुश विठ्ठल नागर, वय ४० वर्षे, सध्या रा. चंदीगड व मुळ रा. अहिल्यानगर यांना दिनांक ०३/०९/२०२६ रोजी अटक करण्यात आली आहे. या गुन्हेगारी कृतीमध्ये सहभागी असणारे इतर इसमांबाबत अधिक तपास सुरु आहे.




