मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : एचसीएमटीआरच्या भूसंपादनासाठी २६३४ कोटींच्या खर्चाला मान्यता

Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : शहरातील वाहतूक कोंडीवर दीर्घकालीन उपाय म्हणून प्रस्तावित उच्च क्षमता द्रुतगती मार्ग अर्थात एचसीएमटीआरसाठी तब्बल २ हजार ६३४ कोटी रुपयांचा भूसंपादन खर्च अपेक्षित आहे.

VK
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

एचसीएमटीआरच्या भूसंपादनासाठी २६३४ कोटींच्या खर्चाला मान्यता ४.९८ लाख चौ.मी. जमीन संपादित करणार ; १५ गावांतील जागांचा समावेश

Pune News : ४.९८ लाख चौ.मी. जमीन संपादित करणार ; १५ गावांतील जागांचा समावेश

Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : शहरातील वाहतूक कोंडीवर दीर्घकालीन उपाय म्हणून प्रस्तावित उच्च क्षमता द्रुतगती मार्ग अर्थात एचसीएमटीआरसाठी तब्बल २ हजार ६३४ कोटी रुपयांचा भूसंपादन खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ४ लाख ९८ हजार ३९० चौ.मी. जमीन संपादित करावी लागणार आहे. या भूसंपादन प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिल्याचे समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.https://maharashtramirror.com/ Pune News

एचसीएमटीआर व इनर रिंग रोड प्रकल्पाच्या जलद अंमलबजावणीचे निर्देश

एचसीएमटीआर तसेच इनर रिंग रोड प्रकल्पाच्या अंमलबजावणीला वेग देण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली २७ जुलै रोजी झालेल्या आढावा बैठकीत देण्यात आले होते. त्यानंतर २८ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत भूसंपादनाचे प्रस्ताव ३१ ऑगस्टपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार महापालिकेने एचसीएमटीआरसाठीचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले आहेत.https://maharashtramirror.com/ Pune News

प्रकल्पासाठी बोपोडी, औंध, भांबुर्डा, एरंडवणा, कोथरूड, हिंगणे, पर्वती, मुंजेरी, वानवडी, हडपसर, मुंढवा, वडगावशेरी, लोहगाव, येरवडा आणि धानोरी या भागांतील जमीन संपादित करावी लागणार आहे. या क्षेत्रासाठी अंदाजे २ हजार ६३४ कोटी रुपयांची नुकसानभरपाई अपेक्षित आहे.

भूसंपादनासाठी मोठ्या निधीची तरतूद करावी लागणार

नवीन भूसंपादन कायदा २०१३ नुसार कलम १९ ची अधिसूचना काढण्यापूर्वी ३० टक्के रक्कम जमा करावी लागते. मात्र, ही रक्कम आधी जमा न करता अंतिम निवाड्याच्या वेळी संपूर्ण नुकसानभरपाईची रक्कम जमा करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करताना महापालिकेला तातडीने ३० टक्के रक्कम जमा करावी लागणार नसली, तरी अंतिम निवाड्याच्या टप्प्यावर मोठ्या निधीची तरतूद करावी लागणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तानुसार संबंधित संस्थांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील जागेची भूसंपादन प्रक्रिया आणि त्यासाठी लागणारा खर्च उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे एचसीएमटीआरच्या कार्यक्षेत्रातील भूसंपादनाचा खर्च महापालिकेलाच करावा लागणार आहे.

दरम्यान, या जमिनीचे संपादन नवीन भूसंपादन कायदा २०१३ तसेच महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ मधील कलम १२६नुसार करण्याची प्रक्रिया प्रस्तावित आहे. त्यासाठी भूसंपादनाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यापूर्वी स्थायी समितीमार्फत मुख्य सभेची मान्यता घेणे योग्य ठरेल, अशी खात्याची शिफारस आहे. प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्यापूर्वीच महापालिकेसमोर २ हजार ६३४ कोटी रुपयांच्या भूसंपादन खर्चाची मोठी आर्थिक जबाबदारी उभी राहिली आहे.

शेअर करा