मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : भाजपा महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा - उपमहापौर परशुराम वाडेकर यांचे आवाहन

Pune News : पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघातून डॉ.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

भाजपा महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा - उपमहापौर परशुराम वाडेकर यांचे आवाहन
भाजपा महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा - उपमहापौर परशुराम वाडेकर यांचे आवाहन

Pune News : पुणे  : पुणे पदवीधर मतदारसंघातून डॉ. स्मिता योगेश जाधव आणि पुणे शिक्षक मतदारसंघातून *मा. कौस्तुभ मुरलीधर गावडे हे भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार असून, या दोन्ही उमेदवारांना पसंतीचे प्रथम क्रमांकाचे मत देऊन प्रचंड मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी केले.https://maharashtramirror.com/ Pune News

आज शहराध्यक्ष संजय सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली पार्टी कार्यालयामध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत शहर उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

ते म्हणाले, "महायुतीचे हे दोन्ही उमेदवार अत्यंत सक्षम आहेत. सर्व कार्यकर्त्यांनी घरोघरी, दारोदारी पोहोचून प्रचार करावा. पसंतीचे एक नंबरचे मत पदवीधर मतदार संघातुन डॉ. स्मिता जाधव आणि शिक्षक मतदार संघातून मा. कौस्तुभ गावडे एक नंबरचे पसंतीचे मत देऊन यांना प्रचंड मतांनी विजयी करावे. येत्या २३ तारखेला महायुतीचा विजय नक्की होणार आहे."

यावेळी त्यांनी सांगितले की, केंद्रीय मंत्री नेते रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून आणण्यासाठी सर्व रिपब्लिकन पक्षाचे नगरसेवक आणि कार्यकर्ते कामाला लागले आहेत.

या बैठकीला राज्याचे माजी सचिव बाळासाहेब जानराव, मा. निलेश अल्हाट, नगरसेवक मोहन जगताप, बाबुराव घाडगे, महिपाल वाघमारे, शाम सदाफुले, किस्टपल राजमनी, अविनाश कदम, विनोद टोपे, संतोष खरात, विरेन साठे, सुनील गवळी, निलेश रोकडे, दामोदरे, खराळ यांच्यासह स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते   श्याम सदाफुले यांनी आभार प्रदर्शन केले

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेअर करा