Pune news : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत गोंधळ; आठ मतपेट्यांच्या सीलवरून आक्षेप
Pune news : पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर आठ मतपेट्यांना अधिकृत सील नसल्याचा दावा करण्यात आल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला.
1 मिनिट वाचन

Pune news : पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर आठ मतपेट्यांना अधिकृत सील नसल्याचा दावा करण्यात आल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला. बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात आज (ता. २७) सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. या प्रकरणी महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा देशमुख यांनी आक्षेप नोंदवल्याचे समजते.https://maharashtramirror.com/ Pune news
मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्राथमिक फेऱ्यांची प्रक्रिया सुरू असताना काही मतपेट्या तपासणीसाठी टेबलवर आणण्यात आल्या. त्यावेळी आठ मतपेट्यांवर निवडणूक आयोगाचे आवश्यक अधिकृत सील नसल्याचा दावा महाविकास आघाडीच्या प्रतिनिधींनी केला..https://maharashtramirror.com/ Pune news
या प्रकाराची माहिती मिळताच मतमोजणी केंद्रावर उपस्थित असलेल्या विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी आक्रमक भूमिका घेतली. संबंधित मतपेट्या मतमोजणी केंद्रात कशा आणण्यात आल्या, असा सवाल पोलिंग एजंट्सनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना केला. या आक्षेपांमुळे केंद्रावरील वातावरण तणावपूर्ण झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि संबंधित आक्षेपांची पडताळणी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी काही काळ मतमोजणी प्रक्रिया स्थगित केली.
निकालासाठी उमेदवारांना प्रतीक्षा
पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पसंतीक्रम पद्धतीने होत असल्याने मतमोजणीच्या अनेक फेऱ्या होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंतिम निकाल जाहीर होण्यासाठी वेळ लागणार आहे.
या मतदारसंघात भाजपच्या स्मिता जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या हर्षदा जाधव यांच्यात प्रमुख लढत आहे. तर पुणे शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडे, सचिन सानप, जयंत आसगावकर आणि दत्तात्रय सावंत यांच्यात सामना होत आहे.
आठ मतपेट्यांवरील सीलबाबत उपस्थित करण्यात आलेल्या आक्षेपांवर निवडणूक प्रशासनाकडून काय स्पष्टीकरण दिले जाते आणि मतमोजणीची प्रक्रिया पुढे कशी सुरू होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




