Pune News : गणेशोत्सवात नारळाची विक्रमी विक्री; दररोज २ ते अडीच लाख नारळांचा खप
Pune News : पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात धार्मिक उत्साह ओसंडून वाहत असून, श्री गणेशाच्या पूजेसाठी, नैवेद्याच्या मोदकांसाठी तसेच नवसाच्या हारांसाठी नारळांची विक्रमी विक्री झाली आहे.
1 मिनिट वाचन

Pune News : पुणे: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात धार्मिक उत्साह ओसंडून वाहत असून, श्री गणेशाच्या पूजेसाठी, नैवेद्याच्या मोदकांसाठी तसेच नवसाच्या हारांसाठी नारळांची विक्रमी विक्री झाली आहे. या उत्सवाच्या काळात पुण्यातील बाजारपेठांमध्ये दररोज तब्बल २ ते अडीच लाख नारळांचा खप होत असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
गणेशोत्सवात घरोघरी आणि गणेशोत्सव मंडळांमध्ये बाप्पाच्या प्रसादासाठी उकडीचे व तळणीचे मोदक मोठ्या प्रमाणावर बनिवले गेले. मोदकांच्या गोड पुरणासाठी ओल्या नारळाची मागणी दरवर्षीप्रमाणे यंदाही शिगेला पोहोचली होती. याशिवाय, अनेक भाविक आपल्या नवसाची पूर्तता करण्यासाठी बाप्पाला २१, ५१ किंवा १०८ नारळांचे विशेष हार अर्पण करतात. या धार्मिक परंपरेमुळे यंदा नारळ विक्रेत्यांचा व्यवसाय अतिशय तेजीत होता.
इतर राज्यांतून आवक आणि दरांची स्थिती
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत (मार्केट यार्ड) दक्षिण भारतातील प्रमुख राज्यांमधून नारळाची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. यात मुख्यत्वे तमिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून दररोज हजारो नारळांनी भरलेल्या गाड्या दाखल होत आहेत.
व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या बाजारातील नारळाचे दर खालीलप्रमाणे आहेत:
बाजारपेठ नारळाचा दर (प्रतिनग)
होलसेल बाजार (मार्केट यार्ड) ₹२८ ते ₹३०
किरकोळ बाजार ₹३५ ते ₹४०
"गणेशोत्सवाच्या या काळात पुणे शहरात दररोज सुमारे २ ते अडीच लाख नारळांची विक्री झाली. परराज्यातून आवक उत्तम असल्याने मागणी तशी पुरवठा सुरळीत ठेवणे शक्य झाले असून, व्यापाऱ्यांचा व्यवसाय अत्यंत समाधानकारक झाला आहे," अशी माहिती मार्केट यार्डातील नारळ व्यापारी दीपक बोरा यांनी दिली.




