Pune News : गणेशोत्सवात सायंकाळी मध्यवर्ती भागातील रस्ते बंद; PMPML कडून बसमार्गांत मोठे बदल
Pune News : पुणे, मिरर : गणेशोत्सव २०२६ च्या कालावधीत (१४ ते २५ सप्टेंबर २०२६) पुण्यातील मध्यवर्ती भागात देखावे व रोषणाई पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होते.
1 मिनिट वाचन

Pune News : पुणे, मिरर : गणेशोत्सव २०२६ च्या कालावधीत (१४ ते २५ सप्टेंबर २०२६) पुण्यातील मध्यवर्ती भागात देखावे व रोषणाई पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होते. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून रोज सायंकाळी पाच वाजल्यापासून मध्यवर्ती भागातील मुख्य रस्ते वाहतुकीसाठी बंद केले जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर, प्रवासी, विद्यार्थी आणि कामगारांची गैरसोय टाळण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) स्थानकनिहाय पर्यायी मार्गांचे नियोजन जाहीर केले आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
प्रमुख बसमार्गांमधील महत्त्वाचे बदल:
• शिवाजी रोड व टिळक रोड: शिवाजी रोड बंद झाल्यावर स्वारगेटकडे जाणाऱ्या बसेस (उदा. २, ११, ३०, ३७, ४६ इत्यादी) जंगली महाराज रोड, बालगंधर्व, डेक्कन आणि संभाजी पुलावरून टिळक रोडमार्गे जातील. टिळक रोडही बंद झाल्यास, या बसेस शास्त्री रोड, दांडेकर पूल आणि मित्र मंडळ चौकातून पुढे जातील.https://maharashtramirror.com/ Pune News
• डेक्कन व कोथरूड मार्ग: कोथरूडकडून पुणे स्टेशनकडे जाणाऱ्या बसेसचा (८१, ९४, १०८, १४३ इत्यादी) जाण्याचा मार्ग पूर्ववत राहील. मात्र, पुणे स्टेशनवरून परतताना लक्ष्मी रोड बंद असल्यास बसेस ससून हॉस्पिटल, जुना बाजार, मनपा भवन, काँग्रेस भवन आणि बालगंधर्वमार्गे डेक्कनकडे वळवल्या जातील.
• रद्द व संक्षिप्त मार्ग: मार्ग क्र. ३ आणि ६ हे रस्ते बंद असल्याच्या काळात पूर्णपणे बंद राहतील. मार्ग क्र. ५५ च्या बसेस शनिपार/मंडई ऐवजी नटराज स्थानकावरून सुटतील, तर मार्ग क्र. ५८ आणि ५९ डेक्कन जिमखाना स्थानकावरून सोडल्या जातील.
• इतर पर्यायी मार्ग: शास्त्री रोड बंद झाल्यास मार्ग क्र. १२, ४२ आणि २९९ च्या बसेस दांडेकर पूल, सेनादत्त पोलीस चौकी आणि म्हात्रे पुलावरून कर्वे रोडने चालवल्या जातील. तसेच मार्ग क्र. १७, २५ आणि ५० या बसेस स्वारगेट/सारसबाग स्थानकावरून सुटतील.
पीएमपीएमएल चे नागरिकांना आवाहन: वाहतूक पोलिसांकडून ऐनवेळी बदल झाल्यास त्यानुसार बस संचलनात सुधारणा केली जाईल. सर्व प्रवाशांनी या पर्यायी मार्गांची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन पीएमपीएमएल चे मुख्य ट्रान्सपोर्ट मॅनेजर (ऑपरेशन) आणि जनसंपर्क अधिकाऱ्यांनी केले आहे.




