मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : गणेश मंडळांवरील गुन्हे मागे घ्या;पुणे शहर गणेशोत्सव समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पुणे, महाराष्ट्र मिरर : पुण्यातील गणेश मंडळांवर गेल्या अनेक वर्षांत दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी पुणे शहर गणेशोत्सव समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

VK
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

गणेश मंडळांवरील गुन्हे मागे घ्या पुणे शहर गणेशोत्सव समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी; पोलीस-महापालिकेने सर्व मंडळांना समान वागणूक देण्याची भूमिका
गणेश मंडळांवरील गुन्हे मागे घ्या पुणे शहर गणेशोत्सव समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी; पोलीस-महापालिकेने सर्व मंडळांना समान वागणूक देण्याची भूमिका

Pune News : पोलीस-महापालिकेने सर्व मंडळांना समान वागणूक देण्याची भूमिका

पुणे, महाराष्ट्र मिरर : पुण्यातील गणेश मंडळांवर गेल्या अनेक वर्षांत दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी पुणे शहर गणेशोत्सव समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. शहरातील ३०० हून अधिक गणेश मंडळांवर ध्वनिप्रदूषणासंदर्भात गुन्हे दाखल करण्यात आले असून, हे गुन्हे दाखल करताना शास्त्रशुद्ध तपासणी आणि आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली नसल्याचा आरोप समितीने केला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

समितीने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान ध्वनिप्रदूषणाच्या नावाखाली मंडळांवर सरसकट कारवाई करण्यात आली. नियमानुसार स्पीकरचा वापर करणाऱ्या आणि डीजे व प्लाझ्माचा वापर न करणाऱ्या काही मंडळांवरही गुन्हे दाखल झाल्याचा दावा समितीने केला आहे. मंडळांची बाजू जाणून घेण्यासाठी कायद्यानुसार अपेक्षित असलेली प्रक्रिया पूर्ण न करता प्रकरणे थेट न्यायालयात पाठविण्यात आल्याचा आक्षेपही निवेदनातून नोंदविण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

काही मंडळांवर पूर्वग्रहातून कारवाई होत असल्याचा आरोपही समितीने केला आहे. विशेषतः विसर्जन मिरवणुकीत स्पीकर लावणाऱ्या मंडळांवर ध्वनिप्रदूषणाचे गुन्हे दाखल केले जातात आणि त्यामुळे मंडळांमध्ये भेदभावाची भावना निर्माण होत असल्याचे समितीचे म्हणणे आहे. त्यामुळे गणेश मंडळांवर गुन्हे दाखल करताना सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी आणि केवळ स्पीकरचा वापर केला म्हणून थेट गुन्हा दाखल करू नये, अशी मागणी करण्यात आली आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

समितीने शुक्रवारी (दि. ४) प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनातून पोलीस आणि पुणे महापालिका प्रशासनाकडेही विविध मागण्या मांडल्या आहेत. विसर्जन मिरवणुकीतील सर्व रस्त्यांवर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवावा आणि मिरवणूक वेळेत संपविण्यासाठी प्रशासनाने मंडळांना सहकार्य करावे. तसेच महापालिकेच्या जागा मंडळांना वापरासाठी देताना शुल्क आकारण्याची स्पष्ट व समान पद्धत असावी, असे समितीने म्हटले आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

पोलीस आणि पुणे महापालिका प्रशासनाने मोजक्या मंडळांना प्राधान्य न देता शहरातील सर्व गणेश मंडळांना समान वागणूक द्यावी, अशीही समितीची भूमिका आहे. गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणत्याही रस्त्यावर पादचाऱ्यांना बंदी घालू नये, अशी मागणीही करण्यात आली आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

गणेशोत्सवाची परंपरा आणि कायदा-सुव्यवस्था यांचा समतोल राखण्यासाठी प्रशासन आणि मंडळांमध्ये समन्वय आवश्यक असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मंडळांवर दाखल असलेले खटले मागे घेण्याबाबत राज्य सरकारने निर्णय घ्यावा, अशी मागणी पुणे शहर गणेशोत्सव समितीने केली आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

शेअर करा