मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : पुण्यात ईएसआयसी मेडिकल कॉलेजला मंजुरी

महत्वाचे मुद्दे

VK
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

पुण्यात ईएसआयसी मेडिकल कॉलेजला मंजुरी
पुण्यात ईएसआयसी मेडिकल कॉलेजला मंजुरी

Pune News : मुख्यमंत्री फडणवीसांच्या पाठपुराव्याला यश; बिबवेवाडीतील रुग्णालयाशी संलग्न महाविद्यालयाला ५० एमबीबीएस जागा; २०२७-२८ पासून प्रवेश

महत्वाचे मुद्दे

*वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव यापूर्वी दोन वेळा फेरविचारासाठी परत पाठविण्यात आला होता
*त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी या विषयात विशेष लक्ष घालून केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला
*ईएसआयसी परिसरात ५०० खाटांचे रुग्णालय उभारण्याचे काम डिसेंबरअखेर पूर्ण होणारhttps://maharashtramirror.com/Pune News

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठपुराव्यानंतर पुण्यातील बिबवेवाडी येथील कर्मचारी राज्य विमा निगमच्या (ईएसआयसी) रुग्णालयाशी संलग्न नवीन वैद्यकीय महाविद्यालयाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने या महाविद्यालयासाठी एमबीबीएसच्या ५० जागांना मंजुरी दिली असून, शैक्षणिक वर्ष २०२७-२८ पासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

ईएसआयसी रुग्णालयात ५० विद्यार्थी क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. हा प्रस्ताव यापूर्वी दोन वेळा फेरविचारासाठी परत पाठविण्यात आला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयात विशेष लक्ष घालून केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनीही मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे मंजुरी मिळण्यास मदत झाल्याचे सांगितले आहे.

दोनदा प्रस्ताव परत, अखेर मिळाली मंजुरी
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुण्यात ही माहिती देताना ईएसआयसी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय यापूर्वीच झाला होता; मात्र संबंधित प्रस्ताव दोनदा परत पाठविण्यात आला होता, असे सांगितले. त्यानंतर केलेल्या पाठपुराव्यामुळे आता ५० एमबीबीएस जागांना मंजुरी मिळाली आहे. पुणेकरांची दीर्घकाळाची मागणी यामुळे पूर्ण झाल्याचे त्यांनी म्हटले.

फडणवीस यांनी या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांचे आभार मानले. पुण्यातील या नव्या वैद्यकीय महाविद्यालयामुळे एमबीबीएसचे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणखी ५० जागा उपलब्ध होणार आहेत.

५०० खाटांचे रुग्णालयही उभारणीच्या मार्गावर
बिबवेवाडीतील ईएसआयसी परिसरात ५०० खाटांचे रुग्णालय उभारण्याचे कामही सुरू आहे. हे काम डिसेंबरअखेर पूर्ण होऊन रुग्णालय कार्यान्वित होण्याची अपेक्षा असल्याची माहिती माधुरी मिसाळ यांनी दिली आहे. सध्या येथील ईएसआयसी रुग्णालय १० एकर परिसरात असून त्याची क्षमता २२० खाटांची आहे.

नव्या वैद्यकीय महाविद्यालयामुळे पुण्यातील वैद्यकीय शिक्षणाच्या उपलब्ध जागांमध्ये वाढ होणार आहे. त्याचबरोबर पुणे तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि अन्य भागांतून उपचारांसाठी शहरात येणाऱ्या रुग्णांना उपलब्ध असलेल्या आरोग्य सुविधांचा विस्तार होण्यासही मदत होण्याची अपेक्षा आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेअर करा