मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune Dry Day : 'ड्राय डे' असताना अवैध मद्य विक्री; हिंजवडीत हॉटेल मालकासह जागा मालकावर गुन्हा दाखल

Pune Illegal Liquor Seller Arrested : 44 हजारांचे मद्य जप्त; नियमांचे उल्लंघन करत आर्थिक फायद्यासाठी हॉटेलचा वापर

V
Vivek

1 मिनिट वाचन

Pune Dry Day : 'ड्राय डे' असताना अवैध मद्य विक्री; हिंजवडीत हॉटेल मालकासह जागा मालकावर गुन्हा दाखल

Pune Illegal Liquor Seller Arrested : 44 हजारांचे मद्य जप्त; नियमांचे उल्लंघन करत आर्थिक फायद्यासाठी हॉटेलचा वापर

पुणे/हिंजवडी :- 'ड्राय डे' (मद्य विक्रीस बंदी) असतानाही बेकायदेशीरपणे मद्य विक्री करणाऱ्या एका हॉटेलवर हिंजवडी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी हॉटेल मालकासह व्यवस्थापक आणि जागा मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना हिंजवडी परिसरातील Pune Hinjewadi साखरेवस्ती येथे उघडकीस आली आहे. Pune Latest Crime News

पोलीस शिपाई अजित शिंदे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात Pune Hinjewadi Police Station यासंबंधी फिर्याद दिली आहे. त्यानुसार हॉटेल मालक, व्यवस्थापक आणि जागा मालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल मालक आणि व्यवस्थापक यांनी 'ड्राय डे' असताना, तसेच मद्य विक्री करण्याचा कोणताही वैध परवाना नसताना, केवळ स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हॉटेलमध्ये मद्य विक्री सुरू ठेवली होती. यावेळी पोलिसांनी कारवाई केली असता, त्यांच्याकडे 44 हजार 865 रुपये किमतीची मद्य विक्रीसाठी ठेवलेली आढळून आली.

या कारवाईत जागा मालकाची भूमिकाही संशयास्पद आढळली आहे. हॉटेल मालकाकडे मद्य विक्रीचा वैध परवाना नाही हे माहीत असताना देखील जागा मालकाने आपली जागा हॉटेल चालवण्यासाठी आणि अवैध मद्य विक्रीसाठी भाड्याने उपलब्ध करून दिली, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.याप्रकरणी हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

शेअर करा