मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : दिवाळीच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर बाजीराव आणि शिवाजी रोडवर जड वाहनांना बंदी; वाहतूक पोलिसांचा महत्त्वाचा निर्णय

Pune News : पुणे : दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने पुण्यातील मध्यवर्ती बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.

VK
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

दिवाळीच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर बाजीराव आणि शिवाजी रोडवर जड वाहनांना बंदी; वाहतूक पोलिसांचा महत्त्वाचा निर्णय
दिवाळीच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर बाजीराव आणि शिवाजी रोडवर जड वाहनांना बंदी; वाहतूक पोलिसांचा महत्त्वाचा निर्णय

Pune News : पुणे : दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने पुण्यातील मध्यवर्ती बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. लक्ष्मी रोड, तुळशीबाग, कुमठेकर रोड आणि केळकर रोड परिसरात दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांची मोठी वर्दळ वाढली आहे. या गर्दीमुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत असल्याने वाहतूक पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दिवाळीचा सण संपेपर्यंत बाजीराव रोड आणि शिवाजी रोडवर जड वाहनांच्या प्रवेशास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या मार्गांवर शनिवार आणि रविवारी जड वाहनांना दिली जाणारी सवलतही रद्द करण्यात आली आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

मध्यवर्ती बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी झुंबड


दिवाळीनिमित्त कपडे, फराळाचे साहित्य, आकाशकंदील, पणत्या, सजावटीच्या वस्तू आणि पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने बाजारपेठांमध्ये दाखल होत आहेत. त्यामुळे लक्ष्मी रोड, तुळशीबाग, कुमठेकर रोड आणि केळकर रोड परिसरात दिवसभर वाहनांची वर्दळ आणि पादचाऱ्यांची गर्दी पाहायला मिळत आहे. शनिवारी या परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याने वाहनचालकांसह खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनाही अडचणींचा सामना करावा लागला.https://maharashtramirror.com/ Pune News

शनिवार-रविवारची सवलतही रद्द


वाढती गर्दी आणि वाहतुकीवरील ताण लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी बाजीराव रोड आणि शिवाजी रोडवरील जड वाहनांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. २५ ऑक्टोबरपासून दिवाळीचा सण संपेपर्यंत हे निर्बंध लागू राहणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. यापूर्वी शनिवार आणि रविवारी जड वाहनांना मिळणारी सवलतही या कालावधीत लागू राहणार नाही. त्यामुळे या दोन्ही प्रमुख मार्गांवर जड वाहनांना प्रवेश करता येणार नाही.

पादचाऱ्यांची सुरक्षितता राखण्यावर भर


दिवाळीच्या काळात मध्यवर्ती बाजारपेठांमध्ये पादचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते. अशा परिस्थितीत जड वाहनांमुळे वाहतुकीचा वेग मंदावणे, रस्त्यांवर कोंडी होणे आणि पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते. ही परिस्थिती टाळण्यासाठी तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

यासंदर्भात पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी आदेश जारी केले आहेत. दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये येणाऱ्या नागरिकांची गैरसोय कमी करणे, वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवणे आणि सुरक्षिततेला प्राधान्य देणे हा या निर्णयामागील उद्देश आहे.

दिवाळीच्या काळात बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, शक्यतो सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा आणि बाजारपेठांमध्ये वाहनांची गर्दी वाढणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेअर करा