मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसाचा जोर; ४ नोव्हेंबरपर्यंत यलो अलर्ट

Pune News : पुणे : पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसाचा जोर वाढला असून, भारतीय हवामान विभागाने ४ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसाचा जोर; ४ नोव्हेंबरपर्यंत यलो अलर्ट
पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसाचा जोर; ४ नोव्हेंबरपर्यंत यलो अलर्ट

Pune News : बारामतीसह जिल्ह्यात पावसाची नोंद; शहरातील काही रस्त्यांवर वाहतूक कोंडी, पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय

Pune News : पुणे : पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसाचा जोर वाढला असून, भारतीय हवामान विभागाने ४ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. बारामतीसह जिल्ह्यातील विविध भागांत पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, पुणे शहरातील काही रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला असून, काही ठिकाणी वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण झाली.https://maharashtramirror.com/ Pune News

अचानक झालेल्या पावसामुळे शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागला. काही रस्त्यांवर वाहतूक संथ झाल्याने नागरिकांना प्रवासासाठी अधिक वेळ द्यावा लागला.

हवामान विभागाने ४ नोव्हेंबरपर्यंत यलो अलर्ट दिल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर वाहनचालकांनी काळजी घ्यावी तसेच सखल भागांतून प्रवास करताना खबरदारी बाळगावी. पुढील हवामान स्थिती आणि पावसाचा जिल्ह्यातील शेती, वाहतूक व जनजीवनावर होणारा परिणाम याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेअर करा