मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : बालुफ ऑटोमेशन करंडक डॉ सतीश ठिगळे मेमोरियल पाचव्या जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत शौरेन सोमण याला दुहेरी मुकुट; शगुन गणेशे, दिया शिंदे, रोहिंटन तोडीवाला यांना विजेतेपद

Pune News :पुणे : पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटना यांच्या वतीने आयोजित बालुफ ऑटोमेशन करंडक डॉ सतीश ठिगळे मेमोरियल पाचव्या जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत शौरेन सोमण याने 17 व 19 वर्षांखालील या दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला.

VK
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

बालुफ ऑटोमेशन करंडक डॉ सतीश ठिगळे मेमोरियल पाचव्या जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत शौरेन सोमण याला दुहेरी मुकुट; शगुन गणेशे, दिया शिंदे, रोहिंटन तोडीवाला यांना विजेतेपद
बालुफ ऑटोमेशन करंडक डॉ सतीश ठिगळे मेमोरियल पाचव्या जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत शौरेन सोमण याला दुहेरी मुकुट; शगुन गणेशे, दिया शिंदे, रोहिंटन तोडीवाला यांना विजेतेपद

Pune News :पुणे : पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटना यांच्या वतीने आयोजित बालुफ ऑटोमेशन करंडक डॉ सतीश ठिगळे मेमोरियल पाचव्या जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत शौरेन सोमण याने 17 व 19 वर्षांखालील या दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला.https://maharashtramirror.com/ Pune News

प्रभात रोड येथील सिम्बायोसिस स्कुल येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत 17 वर्षांखालील मुलांच्या गटात अंतिम लढतीत सहाव्या मानांकित शौरेन सोमण याने चौथ्या मानांकित शारंग गवळीचा 13-11,11-4,11-6 असा सहज पराभव करून विजेतेपद पटकावले. याच मुलींच्या गटात अव्वल मानांकित दिया शिंदेने अहाना गोडबोलेचा 11-9,10-12,9-11,11-8,11-8 असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. दिया हि न्यू इंग्लिश शाळेत नववी इयत्तेत शिकत असून शारदा टॉस टेबल टेनिस अकादमीत प्रशिक्षक दिपेश अभ्यंकर व मकरंद साने यांच्या मार्गदर्शनखाली सराव करते.https://maharashtramirror.com/ Pune News

19 वर्षांखालील मुलांच्या गटात अंतिम सामन्यात चौथ्या मानांकित शौरेन सोमणने तिसऱ्या मानांकित निशाद लेलेचा 9-11,11-8,10-12,11-5,6-11,13-11,11-9 असा कडवा प्रतिकार करत विजेतेपदाला गवसणी घातली. शौरेन हा एमआयटी डब्ल्यूपीयुमध्ये ईसीएसच्या पहिल्या वर्षाला शिकत असून एम्स अकादमीत प्रशिक्षक नीरज होनप यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.

11 वर्षांखालील मुलींच्या गटात अंतिम लढतीत अव्वल मानांकित शगुन गणेशे हिने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत दुसऱ्या मानांकित शरण्या पटवर्धनचा 5-11,11-9,11-7,11-7 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. शगुन हि माऊंट लिटेरा स्कूलमध्ये पाचवी इयत्तेत शिकत असून चॅम्पियन्स टेबल टेनिस अकादमी येथे प्रशिक्षक तेहसीन अन्सारी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.

60 वर्षांवरील प्रौढ गटात अंतिम लढतीत अव्वल मानांकित रोहिंटन तोडीवालाने प्रदीप गुप्ताचा 11-7,5-11,11-7,9-11,11-9 असा पराभव करून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

निकाल: 11 वर्षांखालील मुली: उपांत्य फेरी
शगुन गणेशे[1] वि.वि.अद्विती पाटील[5] 11-4,11-9,11-6;
शरण्या पटवर्धन[2] वि.वि.मायरा शर्मा[3] 11-2,12-10,11-6;
अंतिम फेरी: शगुन गणेशे[1] वि.वि.शरण्या पटवर्धन[2] 5-11,11-9,11-7,11-7;

17 वर्षांखालील मुली: उपांत्य फेरी
दिया शिंदे[1] वि.वि.स्पृहा बोरगावकर 11-5,11-3,11-3;
अहाना गोडबोले वि.वि.मेधा कोत्रा[3] 8-11,11-7,15-17,11-9,11-7;
अंतिम फेरी: दिया शिंदे[1] वि.वि.अहाना गोडबोले 11-9,10-12,9-11,11-8,11-8;

17 वर्षांखालील मुले: उपांत्य फेरी
शारंग गवळी[4]वि.वि.वरदान कोलते 11-6,11-8,11-8;
शौरेन सोमण[6] वि.वि.अनुज फुलसुंदर[2] 11-7,11-7,8-11,11-8;
अंतिम फेरी: शौरेन सोमण[6] वि.वि.शारंग गवळी[4] 13-11,11-4,11-6

60 वर्षांवरील प्रौढ गट: उपांत्य फेरी:
रोहिंटन तोडीवाला[1] वि.वि.रवींद्र कुलकर्णी 13-15,11-5,11-4,6-11,11-7;
प्रदीप गुप्ता वि.वि.हरीश साळवी[2] 5-11,11-9,7-11,11-8,11-6;
अंतिम फेरी: रोहिंटन तोडीवाला[1] वि.वि.प्रदीप गुप्ता 11-7,5-11,11-7,9-11,11-9;

19 वर्षांखालील मुले: उपांत्य फेरी
शौरेन सोमण[4] वि.वि.अनुज फुलसुंदर [1] 11-8,11-7,11-5;
निशाद लेले[3]वि.वि.स्वरूप भाडळकर[2] 11-7,11-5,11-7;
अंतिम फेरी: शौरेन सोमण[4] वि.वि.निशाद लेले[3] 9-11,11-8,10-12,11-5,6-11,13-11,11-9;

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेअर करा