मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

PUNE CRIME : अनियंत्रित ठेवी प्रकरणात मोठी कारवाई; ८२.४० कोटींची बँक खाती अंतरिम जप्त

valentina-megacorp-82-crore-seized

VK
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

valentina-megacorp-82-crore-seized

PUNE CRIME : व्हॅलेन्टिना मेगाकॉर्पशी संबंधित ४२ खात्यांवर कारवाई; भरघोस परताव्याचे आमिष दाखवून ठेवी स्वीकारल्याचा आरोप

PUNE CRIME : गुंतवणूकदारांना भरघोस परताव्याचे आमिष दाखवून अनियंत्रित ठेवी स्वीकारल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. व्हॅलेन्टिना मेगाकॉर्प एलएलपी आणि तिच्याशी संबंधित विविध एलएलपी, कंपन्या तसेच व्यक्तींच्या नावावरील ४२ बँक खात्यांमधील एकूण ८२ कोटी ४० लाख ६१ हजार २६० रुपये अंतरिम जप्त करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी १७ ऑगस्ट रोजी अनियंत्रित ठेव योजना प्रतिबंध अधिनियम, २०१९च्या कलम ७(३) अंतर्गत अंतरिम जप्तीचा आदेश जारी केला.

या प्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६८/२०२६ दाखल करण्यात आला असून, अनियंत्रित ठेव योजना प्रतिबंध अधिनियम, २०१९च्या कलम २१ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित संस्थेच्या नामनिर्दिष्ट भागीदारांनी गुंतवणूकदारांना मोठ्या परताव्याचे आश्वासन देऊन ठेवी स्वीकारल्याचा आरोप आहे. संस्थेचा कोणताही फायदेशीर व्यवसाय नसून नवीन गुंतवणूकदारांकडून स्वीकारलेल्या रकमेतून जुन्या गुंतवणूकदारांना परतावा दिला जात असल्याचा संशय तपासात समोर आला आहे.PUNE CRIME

Pune Crime: सासवड येथील हॉटेलमध्ये अवैध हुक्का बार

तपासादरम्यान संबंधित संस्थेने स्वीकारलेल्या ठेवींमधून स्वतःच्या तसेच अन्य व्यक्ती आणि संबंधित एलएलपीच्या नावावर रक्कम व मालमत्ता संपादित केल्याचे सक्षम प्राधिकाऱ्याच्या निदर्शनास आले. ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी ही रक्कम आणि संबंधित मालमत्ता अंतरिम जप्त करणे आवश्यक असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार विविध बँकांमधील ४२ खात्यांवर अंतरिम जप्तीची कारवाई करण्यात आली.

कारवाई करण्यात आलेल्या खात्यांमध्ये व्हॅलेन्टिना फार्मा एलएलपी, व्हॅलेन्टिना ओव्हरसीज एलएलपी, व्हॅलेन्टिना हॉलिडे रिसॉर्ट्स एलएलपी, व्हॅलेन्टिना इंडस्ट्रीज लिमिटेड, व्हॅलेन्टिना हेल्थ केअर एलएलपी, व्हॅलेन्टिना वेल्थ एज्युकेअर एलएलपी, व्हॅलेन्टिना आयटी सोल्युशन्स एलएलपी, व्हॅलेन्टिना अॅग्रो एलएलपी आणि फिनिक्ससेक सर्व्हिसेस एलएलपी यांच्यासह संबंधित व्यक्तींच्या नावावरील खात्यांचा समावेश आहे. काही खात्यांमध्ये शून्य शिल्लक असली तरी अनेक खात्यांमध्ये लाखो ते कोट्यवधी रुपयांची रक्कम असल्याचे आदेशातील तपशीलातून समोर आले आहे.PUNE CRIME

Pune Crime : देशी-विदेशी दारूची बेकायदा विक्री करणारे दोघे जेरबंद

यातील काही खात्यांमध्ये १२ कोटी ९३ लाख २ हजार ८६४ रुपये, ५ कोटी ९९ लाख ३४ हजार ४४० रुपये, २० कोटी ८७ लाख ४१ हजार ५४६ रुपये आणि ३४ कोटी १० लाख २२ हजार ४७८ रुपये अशा मोठ्या रकमा असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. सर्व संबंधित खात्यांमधील अंतरिम जप्त करण्यात आलेली एकत्रित रक्कम ८२ कोटी ४० लाख ६१ हजार २६० रुपये आहे.

दरम्यान, ही कारवाई अंतरिम स्वरूपाची असून संबंधित प्रकरणातील अंतिम निर्णय झालेला नाही. जप्तीचा आदेश नामनिर्दिष्ट न्यायालयाच्या पुढील आदेशांच्या अधीन राहणार आहे. अंतरिम जप्तीचा अर्थ संबंधित मालमत्ता किंवा रकमेच्या मालकी हक्काबाबत अंतिम निर्णय झाल्याचा लावू नये, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील न्यायालयीन प्रक्रियेनुसार या मालमत्ता आणि बँक खात्यांबाबत निर्णय होणार आहे.PUNE CRIME

PMC : समाविष्ट गावांतील रस्ते, ड्रेनेजच्या कामांना गती द्या

ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने अनियंत्रित ठेव योजना प्रतिबंध अधिनियमांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या स्वाक्षरीने आणि शिक्क्यानिशी १७ ऑगस्ट रोजी पुण्यात हा अंतरिम जप्ती आदेश जारी करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास अलंकार पोलिसांकडून करण्यात येत आहे.PUNE CRIME

View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)

शेअर करा