Pune News : पिसोळीत बंद फ्लॅटमध्ये सव्वासात लाखांची घरफोडी
Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : पिसोळीतील बंद फ्लॅटचे कुलूप उचकटून अज्ञात चोरट्याने २० हजार रुपयांची रोकड तसेच सोने, चांदी आणि हिऱ्यांचे दागिने असा एकूण सात लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
1 मिनिट वाचन

Pune News : रोकडसह सोने, चांदी आणि हिऱ्यांचे दागिने चोरीला; अज्ञात चोरट्याचा शोध सुरू
Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : पिसोळीतील बंद फ्लॅटचे कुलूप उचकटून अज्ञात चोरट्याने २० हजार रुपयांची रोकड तसेच सोने, चांदी आणि हिऱ्यांचे दागिने असा एकूण सात लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना २६ सप्टेंबर रोजी पहाटे पाच ते २८ सप्टेंबर रोजी रात्री अकराच्या दरम्यान घडली.https://maharashtramirror.com/ Pune News
याबाबत उंड्री येथील ५१ वर्षीय नागरिकाने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१ (३), ३३१ (४) आणि ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादींचा जगदंबा भवन रस्त्यावरील सुलई विहारमधील फ्लॅट कुलूप लावून बंद होता. २६ सप्टेंबर रोजी पहाटे पाच ते २८ सप्टेंबर या कालावधीत चोरट्याने मुख्य दरवाजाचे कुलूप उचकटून घरात प्रवेश केला. घरातील २० हजार रुपयांची रोकड आणि सोने, चांदी व हिऱ्यांचे दागिने चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे आरोपीला अद्याप अटक झालेली नाही. सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड पुढील तपास करीत आहेत.




