मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune Crime News | भाईगिरीवर आता राहणार वॉच ! सय्यदनगर चौकीसाठी जागेची चाचपणी? वरिष्ठ पोलिस निरिक्षक पाटील यांच्याकडून प्रयत्न

Pune Crime News

M
mubarak

1 मिनिट वाचन

pune crime news

  • Pune Crime News | सय्यदनगर येथील नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्वपूर्ण निर्णय
  • पुणे, दि. 8 जुलै, महाराष्ट्र मिरर
    मुबारक जिनेरी | Pune Crime News

    हडपसर उपनगरात गुन्हेगारीसाठी अल्पावधीतच गाजलेल्या सय्यदनगर परिसरासाठी पोलिस चौकी निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती समोर येत आहे. भाईगिरीवर वॉच ठेवण्यासाठी गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरणाऱ्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्याकडून जागेची चाचपणी सुरू असल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे. Pune Crime News

    वानवडी पोलिस ठाण्याचे विभाजन होऊन काळेपडळ पोलिस ठाणे अस्तित्वात आल्यानंतर महंमदवाडी तरवडे वस्ती येथे काळेपडळ पोलिस ठाणे कार्यान्वित झाले आहे. यापूर्वी वानवडी हद्दीत असणारा सय्यदनगर, हांडेवाडी रोड परिसर काळेपडळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत समाविष्ट करण्यात आला.

    सय्यदनगर, हांडेवाडी रोड, चिंतामणीनगर, उद्योगनगर, श्रीराम चौक, गुलामअलीनगर ते जेएसपीएम भागासाठी महंमदवाडी पोलिस चौकी कार्यान्वित आहे. परंतू सय्यदनगर येथील वाढती गुन्हेगारी थांबविण्यासाठी स्वतंत्र सय्यदनगर पोलिस चौकीची आवश्यकता भासू लागली आहे.

    चौकी लांब असल्याने त्रास…

    सय्यदनगर, चिंतामणीनगर, हांडेवाडी रोड येथील नागरिकांना तरवडेवस्ती चौकी लांब होत असल्याने सय्यदनगर भागात पोलिस चौकीची आवश्यकता निर्माण झाली आहे. सय्यदनगर येथील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय महत्वपूर्ण ठरणार आहे.

    हेही वाचा: Narendra Mehta : "मराठी मोर्चा संशयास्पद?" — नरेंद्र मेहतांचे विधान पेटवणारं!

    शेअर करा