मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : जबरी चोरीच्या गुन्ह्यातील सराईत आरोपी जेरबंद;पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची धडक कारवाई

Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेअंतर्गत असलेल्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१ ने एका गंभीर गुन्ह्यातील सराईत आणि फरार आरोपीला यशस्वी सापळा रचून बेड्या ठोकल्या आहेत.

VK
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

जबरी चोरीच्या गुन्ह्यातील सराईत आरोपी जेरबंद;पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची धडक कारवाई
जबरी चोरीच्या गुन्ह्यातील सराईत आरोपी जेरबंद;पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची धडक कारवाई

Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेअंतर्गत असलेल्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१ ने एका गंभीर गुन्ह्यातील सराईत आणि फरार आरोपीला यशस्वी सापळा रचून बेड्या ठोकल्या आहेत. दिनांक २३ ऑक्टोबर २०२६ रोजी ही कारवाई करण्यात आली असून, आरोपीने बाणेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

गोपनीय माहितीच्या आधारे सापळा कारवाई


पुणे शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशानुसार दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार अभिलेखावरील पाहिजे, फरार, तडीपार आणि मोका अंतर्गत असलेल्या सराईत गुन्हेगारांचा शोध घेत होते. यादरम्यान, बाणेर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४), ३०९ (६), ११५(२), ३५५, ३५१(२), ३ (५)) नुसार दाखल गुन्ह्यामधील पाहिजे असलेला आरोपी वैभव विजय वाडकर हा केडगाव रेल्वे स्टेशन जवळील कांबळे वस्ती परिसरातील कॅनॉल रोड विट भट्टी परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस अंमलदार अमित गद्रे व ज्ञानेश्वर पिंगळे यांना मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१ चे पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर पिंगळे, अमित गद्रे, साधना पवार आणि नारायण बनकर यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दि. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ठीक ८:१० वाजता पोलिसांनी कांबळेवस्ती, केडगाव परिसरामध्ये सापळा रचून आरोपी वैभव विजय वाडकर (वय २२ वर्षे, रा. मु.पो. वारवडी-गराडे, ता. पुरंदर, जि. पुणे) याला शिताफीने ताब्यात घेतले.

गुन्ह्याची कबुली आणि पुढील हस्तांतरण


ताब्यात घेतल्यावर पोलिसांनी त्याच्याकडे वरील गुन्ह्याबाबत कसून चौकशी केली असता, त्याने बाणेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नमूद गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीची ओळख पटल्यानंतर आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने त्यास पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

सदरची ही यशस्वी कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त (गुन्हे) श्री. गौहर हसन, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-३) श्री. शंकर खटके आणि दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१ चे पोलीस निरीक्षक श्री. मारुती खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार अमित गद्रे, ज्ञानेश्वर पिंगळे, महिला पोलीस अंमलदार साधना पवार व पोलीस अंमलदार नारायण बनकर यांनी पार पाडली आहे. पुणे पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेअर करा