Pune News : पिस्तूल दाखवून तरुणाला धारदार शस्त्राने मारहाण
Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : मीनाताई ठाकरे वसाहतीत १९ वर्षीय तरुणाला चार अनोळखी व्यक्तींनी धारदार शस्त्र, बांबू आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले.
1 मिनिट वाचन

Pune News : मीनाताई ठाकरे वसाहतीतील घटना; चौघांविरुद्ध स्वारगेट पोलिसांत गुन्हा, आरोपी पसार
Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : मीनाताई ठाकरे वसाहतीत १९ वर्षीय तरुणाला चार अनोळखी व्यक्तींनी धारदार शस्त्र, बांबू आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. त्यानंतर पिस्तूल दाखवून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार २७ सप्टेंबर रोजी रात्री पावणेनऊच्या सुमारास घडला. https://maharashtramirror.com/ Pune News
याबाबत मीनाताई ठाकरे वसाहतीतील तरुणाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी आपल्या आजीसोबत तेरा नंबर गल्लीसमोरील स्नानगृहाजवळ थांबले होते. त्यावेळी चार अनोळखी व्यक्तींनी संगनमत करून त्यांच्यावर हल्ला केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
फिर्यादी खालच्या गल्लीतील मुलांसोबत फिरत असल्याच्या रागातून आरोपींनी त्यांना धारदार शस्त्र, बांबू आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच पिस्तूल दाखवून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८ (१), ३५१ (३), ३५२, १३१ आणि ३ (५), तसेच शस्त्र कायद्याच्या कलम ३ (२५) आणि ४ (२५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. पोलीस उपनिरीक्षक निकिता पवार पुढील तपास करीत आहेत.




