Pune Crime : खडीमशीन चौकात मारहाण करून दुचाकी हिसकावली
Pune Crime : पुणे, महाराष्ट्र मिरर : कोंढव्याहून उंड्रीकडे जाणाऱ्या दुचाकीस्वाराला तिघांनी अडवून मारहाण केली आणि त्याची अॅक्टिव्हा स्कुटर जबरदस्तीने नेल्याची तक्रार येवलेवाडी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
1 मिनिट वाचन

Pune Crime : तिघा अनोळखी व्यक्तींविरुद्ध येवलेवाडी पोलिसांत गुन्हा
Pune Crime : पुणे, महाराष्ट्र मिरर : कोंढव्याहून उंड्रीकडे जाणाऱ्या दुचाकीस्वाराला तिघांनी अडवून मारहाण केली आणि त्याची अॅक्टिव्हा स्कुटर जबरदस्तीने नेल्याची तक्रार येवलेवाडी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. ही घटना २ ऑक्टोबर रोजी दुपारी एकच्या सुमारास खडीमशीन चौकात घडली.https://maharashtramirror.com/ Pune Crime
याप्रकरणी दुचाकीस्वाराच्या ३५ वर्षीय मुलाने फिर्याद दिली आहे. फिर्यादी कोंढवा बुद्रुक येथे राहतात. त्यांच्या तक्रारीवरून तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अद्याप अटक झालेली नाही.https://maharashtramirror.com/
फिर्यादीनुसार, त्यांचे वडील अॅक्टिव्हावरून कोंढव्याहून उंड्रीच्या दिशेने जात होते. खडीमशीन चौकात तिघांनी त्यांना अडवून मारहाण केली. त्यानंतर ते चालवत असलेली एमएच १२ एक्ससी ६८८३ क्रमांकाची दुचाकी जबरदस्तीने घेऊन गेले. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक शिवराज खराडे तपास करीत आहेत.




