मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune Crime : पुण्यातील कसबा पेठेत कौटुंबिक वाद विकोपाला गेल्यानंतर पतीने स्वतःवर गोळी झाडून घेतली

पुण्यातील कसबा पेठेत कौटुंबिक वाद विकोपाला गेल्यानंतर पतीने स्वतःवर गोळी झाडून घेतली

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

पुण्यातील कसबा पेठेत कौटुंबिक वाद विकोपाला गेल्यानंतर पतीने स्वतःवर गोळी झाडून घेतली
पुण्यातील कसबा पेठेत कौटुंबिक वाद विकोपाला गेल्यानंतर पतीने स्वतःवर गोळी झाडून घेतली

Pune Crime Kasba Peth: पुण्यातील कसबा पेठ परिसरात सोमवारी एक धक्कादायक घटना घडली आहे. फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भैरवनाथ मंदिराजवळ पती-पत्नीतील कौटुंबिक वाद विकोपाला गेल्यानंतर पतीने स्वतःवर गोळी झाडून घेतली. या घटनेत पतीच्या उजव्या हाताला गोळी लागल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, पतीने खरोखरच स्वत:वर गोळी झाडून घेतली का, याबाबत पोलिसांना साशंकता आहे. त्यामुळे पोलीस या गोष्टीचा तपास करत आहेत.https://maharashtramirror.com/ Pune Crime
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये झालेला वाद इतका तीव्र झाला की, दोघांनीही एकमेकांना गोळी मारण्याबाबत बोलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पत्नीने पतीला कथितरित्या "स्वतःला गोळी मार" असे सांगितल्याची, तर पतीने पत्नीला "मलाच गोळी मार" असे म्हटल्याची माहिती मिळत आहे. याचदरम्यान गोळीबार झाला आणि पतीच्या उजव्या हाताला गोळी लागली. जखमी पतीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर पत्नीही घटनास्थळी नसून तीदेखील रुग्णालयात गेल्याची माहिती आहे. तिच्या चौकशीनंतर या घटनेचा अधिकचा तपशील प्राप्त होण्याची शक्यता आहे. https://maharashtramirror.com/ Pune Crime
घटनास्थळी पोलिसांना रक्ताचे डाग, एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी पंचनामा करून शस्त्रासह इतर पुरावे ताब्यात घेतले आहेत. पती-पत्नीमधील वाद नेमका कोणत्या कारणावरून झाला, गोळी कोणी झाडली, शस्त्र कोणाच्या ताब्यात होते आणि गोळीबार नेमका कसा झाला, याचा फरासखाना पोलीस तपास करत आहेत. सध्या पतीच्या उजव्या हाताला गोळी लागल्याची माहिती समोर आली आहे. आता पुढील तपासातून कोणती नवीन माहिती समोर येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

शेअर करा