मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune Crime : एमपीडीएतील आरोपीसह दोघे जेरबंद गुन्हे शाखा युनिट दोनची कारवाई

Pune Crime : पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे शहर पोलिसांच्या विशेष मोहिमेदरम्यान एमपीडीए कारवाईतील पाहिजे आरोपीसह गंभीर दुखापतीच्या गुन्ह्यात वर्षभरापासून फरार असलेल्या दुसऱ्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथून ताब्यात घेतले.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

एमपीडीएतील आरोपीसह दोघे जेरबंद गुन्हे शाखा युनिट दोनची कारवाई
एमपीडीएतील आरोपीसह दोघे जेरबंद गुन्हे शाखा युनिट दोनची कारवाई

Pune Crime : पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे शहर पोलिसांच्या विशेष मोहिमेदरम्यान एमपीडीए कारवाईतील पाहिजे आरोपीसह गंभीर दुखापतीच्या गुन्ह्यात वर्षभरापासून फरार असलेल्या दुसऱ्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथून ताब्यात घेतले. दोघांनाही पुढील कारवाईसाठी सहकारनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.https://maharashtramirror.com/ Pune Crime
अजित सागर कसबे (वय २१, रा. आंबेगाव पठार, पुणे) आणि ओंकार महेश थोरात (वय २५, रा. जांभुळवाडी, आंबेगाव पठार, पुणे) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. अजित कसबे हा सहकारनगर पोलिसांकडील एमपीडीए कारवाईच्या अनुषंगाने ३ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या आदेशापासून पाहिजे होता. तर ओंकार थोरात हा गंभीर दुखापतीच्या गुन्ह्यात गेल्या वर्षभरापासून फरार होता.
पोलिसांच्या माहितीनुसार, २९ ऑक्टोबर २०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस अंमलदार शंकर कुंभार, महेश मंडलिक आणि सर्जेराव सरगर यांना गोपनीय बातमीदाराकडून दोन्ही आरोपी म्हसवड परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने म्हसवड येथे जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोध घेतला. त्यावेळी दोघेही मिळून आले.
ओंकार थोरात याच्याविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ११८(२), ३(५) तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यातील कलम ३७(१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल आहे.
दोन्ही आरोपी पुणे पोलिसांच्या अभिलेखावरील सराईत आरोपी असून, त्यांच्याविरुद्ध सहकारनगर, भारती विद्यापीठ आणि पर्वती पोलीस ठाण्यांत यापूर्वी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक अविनाश माने, सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल लोहार, तसेच इतर अधिकारी व अंमलदार आणि म्हसवड पोलीस ठाण्याच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेअर करा