मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : पुणे शहरात धमकावून पाइपची लूट; दोन ठिकाणी घरफोडी

Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे शहरात तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये धमकावून लोखंडी पाइप पळविणे आणि दोन ठिकाणी घरफोडी करून रोख रक्कम व दागिने चोरण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.

VK
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

पुणे शहरात धमकावून पाइपची लूट; दोन ठिकाणी घरफोडी
पुणे शहरात धमकावून पाइपची लूट; दोन ठिकाणी घरफोडी

Pune News : भवानी पेठेत सुरक्षा रक्षकाला पिस्तूलसदृश शस्त्राचा धाक; रास्ता पेठ आणि केशवनगरमध्ये लाखोंची चोरी

Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे शहरात तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये धमकावून लोखंडी पाइप पळविणे आणि दोन ठिकाणी घरफोडी करून रोख रक्कम व दागिने चोरण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. भवानी पेठेत तीन अनोळखी व्यक्तींनी सुरक्षा रक्षकाला पिस्तूलसदृश शस्त्राचा धाक दाखवून लोखंडी पाइप नेले, तर रास्ता पेठेत दोन लाख रुपये आणि केशवनगरमध्ये सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेले. याप्रकरणी खडक, समर्थ आणि मुंढवा पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.https://maharashtramirror.com/ Pune News

भवानी पेठेत शस्त्राचा धाक दाखवून पाइप पळविले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास भवानी पेठेतील गुरुनानक नगर परिसरात ही घटना घडली. गांजवे चौक परिसरातील ६० वर्षीय फिर्यादी सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. तीन अनोळखी व्यक्तींनी संगनमत करून त्यांच्यावर चांदीच्या रंगाचे पिस्तूलसदृश शस्त्र रोखले आणि जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांनी सुरक्षा रक्षकाच्या कार्यालय परिसरातील दोन हजार रुपये किमतीचे तीन लोखंडी पाइप जबरदस्तीने नेले.https://maharashtramirror.com/ Pune News

या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५८२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता आणि शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अद्याप अटक झालेले नाहीत.

रास्ता पेठेत दोन लाखांची रोकड चोरीला

रास्ता पेठेतील मेलोनी पार्क, माँ परवेज रोड येथील एका बंद फ्लॅटचे कुलूप उचकटून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. लोखंडी कपाटातील दोन लाख रुपये रोख चोरून नेल्याची तक्रार ७८ वर्षीय व्यक्तीने दिली आहे.

ही घटना २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० ते २८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेच्या दरम्यान घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३४९/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी अज्ञात असून, अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.

केशवनगरमध्ये सोन्या-चांदीचे दागिने लंपास

मुंढवा परिसरातील केशवनगर येथील श्रीकृपा सोसायटीतील जी. जी. हाइट्स इमारतीतील एका बंद फ्लॅटचे कुलूप उचकटून चोरट्याने घरात प्रवेश केला. बेडरूममधील कपाटातून एक लाख ५५ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार ४० वर्षीय रहिवाशाने दिली आहे.

ही घटना २८ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ ते रात्री ९.५० या वेळेत घडली. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३७३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील आरोपीचा शोध सुरू आहे.

पुणे शहर पोलीस आयुक्तालयाने ३० ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केलेल्या गुन्हे नोंदींमध्ये या तीन घटनांची माहिती देण्यात आली आहे. तिन्ही प्रकरणांचा पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्यांकडून सुरू आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेअर करा