मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune Car Accident: पुण्यातील पोर्शे कार अपघातप्रकरणी मोठा खुलासा, रुग्णालयातील कर्मचाऱ्याचे लाच घेतानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर

Pune Porsche Car Accident Latest Update : पुणे पोर्शे अपघात प्रकरणात आता नवा खुलासा समोर आला आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Pune Car Accident: पुण्यातील पोर्शे कार अपघातप्रकरणी मोठा खुलासा, रुग्णालयातील कर्मचाऱ्याचे लाच घेतानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर

Pune Porsche Car Accident Latest Update : पुणे पोर्शे अपघात प्रकरणात आता नवा खुलासा समोर आला आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्याला लाच घेतानाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहे. या रस्ता अपघातात दोघांचा मृत्यू झाला.

पुणे :- पुणे पोलिसांना Pune Police सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून त्यात ससून रुग्णालयातील (Sasoon Hospital Bribe Video) एक कर्मचारी लाच घेताना दिसत आहे. पोर्श कार अपघातात दोन लोक ठार झालेल्या किशोरवयीन ड्रायव्हरच्या रक्ताचे नमुने बदलण्याच्या कटाचा भाग असल्याचा आरोप कर्मचाऱ्यावर आहे. Pune Porsche Car Accident Latest Update

येरवडा परिसरात रेकॉर्ड केलेल्या फुटेजमध्ये मध्यस्थ अश्पाक मकांदर रुग्णालयातील कर्मचारी अतुल घाटकांबळे पैसे देताना दिसत आहेत, असे गुन्हे शाखेच्या ( Crime Branch) अधिकाऱ्याने सांगितले. कल्याणी नगर परिसरात 19 मे रोजी झालेल्या अपघातात, एका किशोरवयीन ड्रायव्हरने चालविलेल्या पोर्शने कारने धडक दिली आणि त्यात दोन आयटी इंजिनियरचा मृत्यू झाला आहे. येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला.

अल्पवयीन मुलाचे वडील बिल्डर विशाल अग्रवाल यांनी दिलेल्या तीन लाख रुपयांपैकी सहआरोपी डॉ. श्रीहरी हलनोर यांनी अडीच लाख रुपये स्वीकारले, तर घाटकांबळे यांनी 50 हजार रुपये स्वीकारले, असा दावा पोलिसांनी केला आहे. डॉ.हलनोर आणि घाटकांबळे यांच्याकडून रक्कम जप्त केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. अल्पवयीन तरुण सध्या निरीक्षण गृहात आहे, तर रक्ताचे नमुने बदलल्याच्या आरोपाखाली त्याच्या आई आणि वडील आजोबा यांना हि अटक करण्यात आली आहे. Pune Porsche Car Accident Latest Update

शेअर करा