Pune News : कॅम्पमध्ये दुकान फोडून तीन लाखांची चोरी;शिवाजी मार्केट परिसरातील रिअल टी डेपोला केले चोरट्यांनी लक्ष्य
Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : पुण्यातील कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटजवळ असलेल्या दुकानाची लोखंडी जाळी उचकटून आणि मागील दरवाजा तोडून चोरट्यांनी तीन लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.या प्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५, ३३१(३
1 मिनिट वाचन

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : पुण्यातील कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटजवळ असलेल्या दुकानाची लोखंडी जाळी उचकटून आणि मागील दरवाजा तोडून चोरट्यांनी तीन लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.या प्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५, ३३१(३) आणि ३३१(४) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉन्हेन्ट स्ट्रीट, कॅम्प येथे राहणाऱ्या ५० वर्षीय व्यक्तीचे शिवाजी मार्केटजवळ ‘रिअल टी डेपो’ नावाचे दुकान आहे. २४ ऑक्टोबर रोजी रात्री नऊ ते २५ ऑक्टोबर रोजी सकाळी आठ या कालावधीत अज्ञात व्यक्तीने दुकानाच्या मागील बाजूची लोखंडी जाळी कशाच्या तरी साहाय्याने उचकटली. त्यानंतर मागील दरवाजा तोडून दुकानात प्रवेश केला.
दुकानातील ड्रॉवरमध्ये ठेवलेली तीन लाख रुपयांची रोकड चोरट्याने चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. अज्ञात आरोपीचा शोध सुरू असून, या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.




