मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune Crime : पुणे लष्कर : पिस्तूल, जिवंत काडतूस बाळगणारा तरुण अटकेत

Pune crime : पुणे, महाराष्ट्र मिरर : कॅम्प परिसरात बेकायदा पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगून फिरणाऱ्या तरुणाला लष्कर पोलिसांनी अटक केली.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

पुणे लष्कर : पिस्तूल, जिवंत काडतूस बाळगणारा तरुण अटकेत
पुणे लष्कर : पिस्तूल, जिवंत काडतूस बाळगणारा तरुण अटकेत

Pune crime : लष्कर पोलिसांची कॅम्प परिसरात कारवाई; वाघोलीतील २७ वर्षीय आरोपीकडून पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त

Pune crime : पुणे, महाराष्ट्र मिरर : कॅम्प परिसरात बेकायदा पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगून फिरणाऱ्या तरुणाला लष्कर पोलिसांनी अटक केली. विश्वास ऊर्फ अण्णा राजू पवार (वय २७, रा. वाघोली, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. लष्कर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गजानन चोरमले यांना ७ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली. कॅम्पमधील टीम लक लक हॉटेलसमोरील स्टेव्हली रोड, बंगला क्रमांक ९ जवळील सार्वजनिक रस्त्यावर एक व्यक्ती पिस्तूल आणि जिवंत काडतूस घेऊन थांबली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.https://maharashtramirror.com/ Pune crime

वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांच्याकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांना कल्पना देण्यात आली. त्यानंतर पोलिस निरीक्षक गजानन चोरमले, सहायक पोलिस निरीक्षक संजय माळी, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलिस उपनिरीक्षक घाडगे आणि पथकाने घटनास्थळी धाव घेतली. संशयिताला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले.https://maharashtramirror.com/ Pune crime

शस्त्र कायद्यानुसार गुन्हा

या प्रकरणी लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २१५/२०२५ नोंदविण्यात आला आहे. प्रेसनोटनुसार भारतीय हत्यार कायदा तसेच महाराष्ट्र पोलिस अधिनियमातील संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी विश्वास ऊर्फ अण्णा राजू पवार याला रात्री ११.५० वाजता अटक करण्यात आली.https://maharashtramirror.com/ Pune crime

ही कारवाई वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली लष्कर पोलिस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संजय माळी करीत आहेत.

शेअर करा