मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : घरफोडीतील पाहिजे आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट दोनची कारवाई,वर्षभरापासून फरार असलेला रोहित सातपुते स्वारगेट बसस्थानकातून ताब्यात

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : घरफोडीच्या गुन्ह्यात सुमारे वर्षभरापासून फरार असलेल्या रोहित दीपक सातपुते (वय २१, रा.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

घरफोडीतील पाहिजे आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट दोनची कारवाई,वर्षभरापासून फरार असलेला रोहित सातपुते स्वारगेट बसस्थानकातून ताब्यात
घरफोडीतील पाहिजे आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट दोनची कारवाई,वर्षभरापासून फरार असलेला रोहित सातपुते स्वारगेट बसस्थानकातून ताब्यात

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : घरफोडीच्या गुन्ह्यात सुमारे वर्षभरापासून फरार असलेल्या रोहित दीपक सातपुते (वय २१, रा. घोरपडे पेठ, पुणे) याला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने स्वारगेट बसस्थानक परिसरातून ताब्यात घेतले. पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला पर्वती पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
पुणे शहरातील पाहिजे आरोपींचा शोध घेण्यासाठी १ नोव्हेंबर २०२६ रोजी विशेष मोहीम राबविण्यात येत होती. यावेळी पोलीस अंमलदार महेश मंडलिक आणि संतोष टकले यांना गोपनीय बातमीदाराकडून रोहित सातपुते स्वारगेट बसस्थानक परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने स्वारगेट एसटी बसस्थानकात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव रोहित दीपक सातपुते असल्याचे सांगितले..https://maharashtramirror.com/ Pune News
सातपुते हा पर्वती पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यामधील पाहिजे आरोपी आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०५, ३३१(३) आणि ३३१(४) अन्वये घरफोडीचा गुन्हा दाखल आहे. तो पुणे शहरातील अभिलेखावरील घरफोडी करणारा आरोपी असून, त्याच्याविरुद्ध शहरातील विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. पोलीस निरीक्षक अविनाश माने, सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल लोहार, महिला पोलीस उपनिरीक्षक तेजस्वी पवार, सहायक पोलीस उपनिरीक्षक शंकर नेवसे आणि युनिट दोनच्या पथकातील अधिकारी व अंमलदारांनी या कारवाईत सहभाग घेतला.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेअर करा