Pune News : भारती विद्यापीठ परिसरात महिला सामाजिक कार्यकर्त्या व रिक्षाचालकाला रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून मारहाण
Pune News : पुणे: पुणे शहरामधील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
1 मिनिट वाचन

Pune News : पुणे: पुणे शहरामधील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पतीच्या अमानुष मारहाणीनंतर एका पीडित महिलेची सुटका करण्यासाठी गेलेली महिला सामाजिक कार्यकर्ती आणि रिक्षाचालक यांना, संबंधित पती व त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मित्राकडून मध्यरात्री रस्ता अडवून उघडपणे धमकवल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चाचा विषय ठरला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
मिळालेल्या माहितीनुसार, कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाणीत अडकलेल्या गौरी नावाच्या महिलेला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी एक महिला सामाजिक कार्यकर्ती मदतीसाठी धावून गेली होती. त्या महिलेला सोबत घेऊन जात असताना, संतापलेला तिचा पती आणि त्याच्या केशरचना किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या साथीदारांनी त्यांचा पाठलाग केला. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रीच्या अंधारात त्यांची रिक्षा अडवण्यात आली.https://maharashtramirror.com/ Pune News
"तू कोण आहेस?" म्हणत अरेरावी आणि दमदाटी
रिक्षा अडवल्यानंतर त्या व्यक्तीने आणि त्याच्या साथीदारांनी महिला सामाजिक कार्यकर्त्याच्या अंगावर धावून जात अरेरावी केली. "तू कोण आहेस? आणि आजपर्यंत कुठे होतीस?" असा उद्धट जाब विचारत रिक्षाचालकाला आणि सामाजिक कार्यकर्त्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत दमदाटी करण्यात आली
एका महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी किंवा मदतीला धावून गेलेल्या महिला सामाजिक कार्यकर्त्याशीच जर असा गुन्हेगारी स्वरूपाचा वर्तन होत असेल, तर महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पोलिस प्रशासनासमोर मोठे आव्हान
या प्रकरणातील संबंधित व्यक्ती रेकॉर्डवरील गुन्हेगार असूनही, रात्रीच्या वेळी उघडपणे रस्त्यावर असा दहशत माजवण्याचा प्रकार सुरू असल्यामुळे स्थानिक पोलिसांच्या गस्तीवर आणि कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आता नागरिकांमधून व सामाजिक वर्तुळातून केली जात आहे.




