मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामतीत ऑटोरिक्षा भाडेवाढ लागू

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : प्रादेशिक परिवहन प्राधिकरण (आरटीओ), पुणे यांच्या वतीने पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामती कार्यक्षेत्रातील ऑटोरिक्षांसाठी मंजूर करण्यात आलेली नवीन भाडेवाढ एक सप्टेंबर पासून लागू झाली आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामतीत ऑटोरिक्षा भाडेवाढ लागू
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामतीत ऑटोरिक्षा भाडेवाढ लागू


Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : प्रादेशिक परिवहन प्राधिकरण (आरटीओ), पुणे यांच्या वतीने पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामती कार्यक्षेत्रातील ऑटोरिक्षांसाठी मंजूर करण्यात आलेली नवीन भाडेवाढ एक सप्टेंबर पासून लागू झाली आहे. आरटीओ पुणे यांनी या सुधारित भाडेदराबाबतची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केली आहे.https://maharashtramirror.com/ Pune News


नवीन ऑटोरिक्षा भाडेदर आणि नियम:
• भाडेदर: पहिल्या दीड किलोमीटर प्रवासासाठी तीस रुपये आणि त्यानंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी वीस रुपये असा सुधारित दर आकारला जाईल. https://maharashtramirror.com/ Pune News
• रात्रीचा प्रवास: पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात रात्री बारा ते सकाळी पाच या वेळेत पंचवीस टक्के अतिरिक्त भाडे आकारता येईल. ग्रामीण भागात रात्री अकरा ते सकाळी पाच या काळात चाळीस टक्के अतिरिक्त भाडे लागू राहील.https://maharashtramirror.com/ Pune News
• सामानाचे शुल्क: प्रवाशांजवळ असलेल्या ६० x ४० सें.मी. किंवा त्यापेक्षा मोठ्या आकाराच्या सामानाच्या प्रत्येक नगासाठी तीन रुपये शुल्क आकारले जाईल. https://maharashtramirror.com/ Pune News
मीटर कॅलिब्रेशन आणि टेरिफ कार्ड: रिक्षाचालकांना मीटर कॅलिब्रेशन करून घेण्यासाठी १ सप्टेंबर ते २८ फेब्रुवारी २०२७ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. या काळात प्रवाशांच्या व चालकांच्या सोयीसाठी आरटीओ ने तात्पुरते टेरिफ कार्ड तयार केले आहे, ज्याची वैधता २८ फेब्रुवारी २०२७ पर्यंतच असेल. या मुदतीनंतर केवळ मीटरप्रमाणेच भाडे स्वीकारणे बंधनकारक राहील. https://maharashtramirror.com/ Pune News
मीटर तपासणी केंद्रे: मीटर तपासणीसाठी पुणे आरटीओ द्वारे खालील तीन ठिकाणी सोय उपलब्ध करण्यात आली आहे: १. कर्वेनगर - अलंकार पोलीस स्टेशनसमोर २. खराडी - इऑन आयटी पार्कजवळ, खराडी पोलीस चौकीसमोर ३. दिवे चाचणी मैदान .

शेअर करा