मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune Auto Rickshaw Fare Hike 2026 : पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये १ सप्टेंबरपासून रिक्षाचे नवे दर

पुणे, (महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी) : Pune Auto Rickshaw Fare Hike 2026 पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये रिक्षांचे सुधारित भाडेदर १ सप्टेंबर २०२६पासून लागू होणार आहेत.

M
mubarak

2 मिनिट वाचन

रिक्षाचे नवे दर १ सप्टेंबरपासून पहिल्या दीड किलोमीटरसाठी ३० रुपये; त्यानंतर प्रत्येक किलोमीटरला २० रुपये
रिक्षाचे नवे दर १ सप्टेंबरपासून पहिल्या दीड किलोमीटरसाठी ३० रुपये; त्यानंतर प्रत्येक किलोमीटरला २० रुपये

रिक्षाचे नवे दर १ सप्टेंबरपासून पहिल्या दीड किलोमीटरसाठी ३० रुपये; त्यानंतर प्रत्येक किलोमीटरला २० रुपये : Pune Auto Rickshaw Fare Hike 2026

पुणे, (महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी) : Pune Auto Rickshaw Fare Hike 2026
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये रिक्षांचे सुधारित भाडेदर १ सप्टेंबर २०२६पासून लागू होणार आहेत. त्यानुसार पहिल्या १.५ किलोमीटरसाठी ३० रुपये, तर त्यानंतर प्रत्येक किलोमीटरसाठी २० रुपये आकारले जाणार आहेत. या दरवाढीमुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासाचा खर्च वाढणार आहे.सीएनजीच्या दरातील वाढ, वाहनांच्या सुट्या भागांच्या किमती आणि देखभाल-दुरुस्तीच्या वाढत्या खर्चामुळे रिक्षा संघटनांनी भाडेवाढीची मागणी केली होती. या मागणीनंतर सुधारित दर निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. महाराष्ट्र मिरर, Maharashtra Mirror, Google

Pune Auto Rickshaw Fare Hike 2026 : पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये १ सप्टेंबरपासून रिक्षाचे नवे दर

मीटर अद्ययावत करण्यासाठी मुदत रिक्षांच्या डिजिटल मीटरमध्ये नवीन दर अद्ययावत करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने रिक्षाचालकांना २८ फेब्रुवारी २०२७पर्यंत मुदत दिली आहे. या कालावधीत मीटरचे फेरप्रमाणीकरण पूर्ण होईपर्यंत रिक्षाचालकांना आरटीओने प्रमाणित केलेले अधिकृत दरपत्रक जवळ ठेवणे बंधनकारक असेल.प्रवाशांनी मागणी केल्यास चालकांनी दरपत्रक दाखवून त्यानुसारच भाडे आकारावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मीटरनुसार भाडे न आकारणे, जादा रक्कम मागणे किंवा प्रवास नाकारणे, असे प्रकार घडल्यास प्रवाशांनी आरटीओकडे तक्रार करावी. संबंधित चालकांवर कारवाई केली जाईल, असे परिवहन विभागाकडून सांगण्यात आले आहे. maharashtra mirror.com

Pune Auto Rickshaw Fare Hike 2026 : पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये १ सप्टेंबरपासून रिक्षाचे नवे दर

चार वर्षांनंतर भाडेवाढ
रिक्षा पंचायत पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष नितीन पवार म्हणाले, “रिक्षाच्या भाड्यात तब्बल चार वर्षांनंतर वाढ करण्यात आली आहे. या काळात महागाई मोठ्या प्रमाणात वाढली असून, त्याच्या तुलनेत झालेली दरवाढ कमी आहे. शासनाच्या नियमानुसार ही वाढ झाली असली, तरी रिक्षाचालक पूर्णपणे समाधानी नाहीत. मात्र, सध्याच्या परिस्थितीत रोजचा खर्च आणि उदरनिर्वाह भागविण्यासाठी ही दरवाढ काही प्रमाणात दिलासा देणारी आहे.” maharashtra mirror.com

प्रवाशांच्या खर्चात वाढ
नव्या दरांमुळे लहान अंतराच्या प्रवासासाठीही प्रवाशांना पूर्वीपेक्षा अधिक पैसे मोजावे लागतील. विशेषतः दररोज रिक्षाने कामावर, महाविद्यालयात किंवा स्थानकावर जाणाऱ्या प्रवाशांच्या मासिक खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.
मीटरचे फेरप्रमाणीकरण पूर्ण होईपर्यंत प्रवाशांनी अधिकृत दरपत्रक तपासूनच भाडे द्यावे. चालकाने जादा भाडे मागितल्यास रिक्षाचा क्रमांक, प्रवासाची वेळ आणि ठिकाण नोंदवून आरटीओकडे तक्रार करावी. maharashtra mirror.comhttps://maharashtramirror.com/

नवे प्रस्तावित दर
पहिले १.५ किलोमीटर : ३० रुपये
त्यानंतर प्रत्येक किलोमीटर : २० रुपये
नवीन दर लागू : १ सप्टेंबर २०२६
मीटर फेरप्रमाणीकरणाची अंतिम मुदत : २८ फेब्रुवारी २०२७ maharashtra mirror.com

शेअर करा