Pune News : विमानतळ परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलस्वार तरुण ठार; चालक फरार
Pune News :पुणे: विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत जेल रोडवरील बस स्टॉपजवळ एका अज्ञात भरधाव वाहनाने मोटारसायकलस्वारास जोरदार धडक दिली.
1 मिनिट वाचन

Pune News :पुणे: विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत जेल रोडवरील बस स्टॉपजवळ एका अज्ञात भरधाव वाहनाने मोटारसायकलस्वारास जोरदार धडक दिली. या अपघातात २७ वर्षीय तरुण जागीच गंभीर जखमी होऊन मयत झाला असून, अपघात घडल्यानंतर वाहनचालक घटनास्थळावरून न थांबता व पोलिसांना खबर न देता पसार झाला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
याप्रकरणी अनिल किसनराव राऊत (वय ५७ वर्षे, रा. येरवडा) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री २०:१० वाजेच्या सुमारास ५०९ चौकाजवळ, बिडकर नर्सरीसमोर, बस स्टॉपजवळ, जेल रोड, पुणे येथे ही घटना घडली. एका अज्ञात वाहनाच्या चालकाने त्याचे ताब्यातील वाहन वाहतूक नियमांची कोणतीही परवा न बाळगता अत्यंत हयगयीने, अविचाराने व भरधाव वेगात चालवले.
या अज्ञात वाहनाने फिर्यादी यांचा पुतण्या, मोटारसायकलस्वार केवेन विनायक राऊत (वय २७ वर्षे, रा. विश्रांतवाडी) यांस जोराची धडक दिली. या भीषण अपघातात केवेन राऊत हे गंभीर जखमी होऊन मयत झाले. मात्र, अज्ञात वाहनचालकाने अपघाताच्या ठिकाणी न थांबता व जखमीबद्दल कोणतीही माहिती किंवा खबर न देता वाहनासहित पळ काढला. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध भा.न्या.सं. कलम १०६(१) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४, ११९/१७७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस अंमलदार माळी करीत आहेत.




