मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : पुण्यात ५६ बालकांवर यशस्वी हृदयशस्त्रक्रिया

Pune News : पुणे, मिरर : बालकांमधील हृदयाशी संबंधित गंभीर आजारांचे लवकर निदान करून त्यांच्यावर वेळेत उपचार करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत पुणे जिल्हा प्रशासनाने महत्त्वाची कामगिरी केली आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

पुण्यात ५६ बालकांवर यशस्वी हृदयशस्त्रक्रिया
पुण्यात ५६ बालकांवर यशस्वी हृदयशस्त्रक्रिया

Pune News : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातून गंभीर आजारांचे लवकर निदान; उपचाराला मिळाली गती

Pune News : पुणे, मिरर : बालकांमधील हृदयाशी संबंधित गंभीर आजारांचे लवकर निदान करून त्यांच्यावर वेळेत उपचार करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत पुणे जिल्हा प्रशासनाने महत्त्वाची कामगिरी केली आहे. एप्रिल ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत हृदयशस्त्रक्रियेसाठी निश्चित करण्यात आलेल्या सर्व ५६ बालकांवर यशस्वीपणे शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे निश्चित केलेल्या हृदयशस्त्रक्रियांची शंभर टक्के पूर्तता झाल्याचे दिलासादायक चित्र पुणे जिल्ह्यात दिसून आले आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जन्मजात व्यंग, बालपणातील आजार, कमतरता आणि विकासात्मक विलंब यांचे लवकर निदान करण्यावर भर दिला जातो. जन्मापासून १८ वर्षांपर्यंतच्या बालकांची आरोग्य तपासणी करून आजाराचे निदान झाल्यास त्यांना आवश्यक उपचार तसेच पुढील उपचारासाठी संदर्भ सेवा उपलब्ध करून दिली जाते. हृदयविकारासारख्या गंभीर आजारांचे निदान झाल्यानंतर संबंधित बालकांना आवश्यक शस्त्रक्रियेसाठी तज्ज्ञ रुग्णालयांमध्ये संदर्भित केले जाते.

बालकांमध्ये हृदयविकाराचे निदान लवकर झाल्यास वेळेत उपचार करणे शक्य होते. त्यामुळे आजाराची तीव्रता वाढण्यापूर्वीच आवश्यक वैद्यकीय हस्तक्षेप करता येतो. अनुवंशिक कारणांमुळेही अनेक बालकांमध्ये हृदयविकाराचा धोका असतो. अशा परिस्थितीत नियमित तपासणी आणि लवकर निदानाला विशेष महत्त्व आहे.

पुणे जिल्ह्यात एप्रिल ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत हृदयशस्त्रक्रियेसाठी निश्चित करण्यात आलेल्या ५६ बालकांपैकी सर्व ५६ बालकांवर शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आली. राज्यस्तरीय आकडेवारीत पुण्याची ही नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, याच कालावधीत इतर विविध आजारांसाठी शस्त्रक्रियेसाठी निश्चित करण्यात आलेल्या ७५३ बालकांवरही शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत.

त्यामुळे पुणे जिल्ह्यात हृदयशस्त्रक्रियांसह इतर शस्त्रक्रियांचीही शंभर टक्के पूर्तता झाली आहे. गंभीर आजारांचे वेळेत निदान, योग्य उपचारासाठी संदर्भ सेवा आणि शस्त्रक्रियांची प्रभावी अंमलबजावणी यामुळे बालकांना वेळेत उपचार मिळण्यास मोठी मदत होत आहे

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा