मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : शहरातील वाहतूक कोंडी सुरळीत होणार

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या वाढत्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुणे महानगरपालिका क्षेत्रातील महत्त्वाच्या २५० चौकांमध्ये ५०० ट्रॅफिक वॉर्डन नियुक्त करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

शहरातील वाहतूक कोंडी सुरळीत होणार
शहरातील वाहतूक कोंडी सुरळीत होणार

Pune News : ५०० ट्रॅफिक वॉर्डन नियुक्तीचा मार्ग मोकळा

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या वाढत्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुणे महानगरपालिका क्षेत्रातील महत्त्वाच्या २५० चौकांमध्ये ५०० ट्रॅफिक वॉर्डन नियुक्त करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. स्थायी समितीने या प्रस्तावास मंजुरी दिली असून, यासाठी वर्षभरात १७ कोटी ९ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

उच्चस्तरीय बैठकीत निर्णय


शहरातील वाढती लोकसंख्या, वाहनांची संख्या आणि प्रमुख रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता, वाहतूक पोलिसांनी महापालिकेकडे अतिरिक्त मनुष्यबळाची मागणी केली होती. महापौर मंजुषा नागपुरे यांनीही कोंडी दूर करण्यासाठी तातडीने वॉर्डन नेमण्याच्या सूचना दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर १४ ऑगस्ट रोजी महापालिका आणि वाहतूक पोलिस विभागात उच्चस्तरीय बैठक पार पडली. यामध्ये वाहतूक विभागाने सुचवलेल्या २४२ चौकांमध्ये प्रत्येकी दोन आणि बावधन विभागातील ८ चौकांसाठी १६ ट्रॅफिक वॉर्डन नेमण्याचे निश्चित करण्यात आले.https://maharashtramirror.com/ pune news

अंदाजपत्रकात निधीची तरतूद


यंदाच्या महापालिकेच्या अंदाजपत्रकात वाहतूक नियोजनासाठी योग्य तरतूद करण्यात आली आहे. या कामाचे पूर्वगणपत्रक १७ कोटी ८ लाख ९९ हजार ५६० रुपये इतके तयार करण्यात आले आहे. नियमानुसार निविदा प्रक्रिया आणि कार्यादेश देण्यासाठी होणारा विलंब टाळण्यासाठी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ६७-३ (क) नुसार मिळालेल्या आणीबाणीच्या विशेष अधिकारांचा वापर करत हे काम तातडीने हाती घेण्याचे आदेश दिले आहेत. जनतेची सुरक्षितता आणि आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

यापूर्वी ट्रॅफिक वॉर्डनच्या सेवा शुल्कासह मनुष्यबळ पुरविण्याची कार्यवाही सुरक्षा विभागामार्फतच पार पाडण्यात आली होती. त्यामुळे सदरचे काम सुरक्षा विभागामार्फतच करून घेण्याची शिफारस करण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांच्या समन्वयाने हे ५०० वॉर्डन शहरातील प्रमुख चौकांमध्ये वाहतूक नियमन, कोंडी निवारण आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कार्यरत राहणार आहेत. या निर्णयामुळे पुणेकरांचा प्रवास अधिक सुकर आणि सुरक्षित होण्यास मदत मिळणार आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://maharashtramirror.com/

शेअर करा