Pune Crime : पुण्यात २२ तासांत १२३ मुलींचं अपहरण झाल्याचा दावा
Pune Crime : पुणे: शहरात गेल्या २२ तासांत तब्बल १२३ मुलींचे अपहरण झाल्याचा दावा करणारी रील आणि ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती.
1 मिनिट वाचन

Pune Crime : सोशल मीडियावरील रील आणि ऑडिओ क्लिप तथ्यहीन: पोलिस
Pune Crime : पुणे: शहरात गेल्या २२ तासांत तब्बल १२३ मुलींचे अपहरण झाल्याचा दावा करणारी रील आणि ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. या दाव्यामुळे शहरात भीतीचे आणि संभ्रमाचं वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पुणे पोलिसांनी या दाव्याची पडताळणी केल्यानंतर १२३ मुलींच्या अपहरणाला पुष्टी देणारी कोणतीही ठोस माहिती किंवा पुरावा समोर आला नसल्याचे स्पष्ट केले आहे.https://maharashtramirror.com/ Pune Crime
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या रील आणि ऑडिओ क्लिपची पुणे पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली. संबंधित पोलीस ठाणे, गुन्हे शाखा आणि इतर माध्यमातून या दाव्याची पडताळणी करण्यात आली. https://maharashtramirror.com/ Pune Crime
या प्रकरणात संबंधित ऑडिओ रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीशी पोलिसांनी संपर्क साधून माहिती घेतली. तसेच, संबंधित सोसायटीचे पदाधिकारी, व्यवस्थापन, शेजारी आणि इतर व्यक्तींकडूनही चौकशी करण्यात आली. या चौकशीत पुणे शहरात गेल्या २२ तासांत १२३ मुलींचे अपहरण झाल्याचे सिद्ध करणारी कोणतीही ठोस माहिती, नोंद किंवा पुरावा पोलिसांच्या निदर्शनास आलेला नाही.
त्यामुळे सोशल मीडियावर प्रसारित होत असलेली रील आणि ऑडिओ क्लिप तथ्यहीन आणि निराधार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, या प्रकरणाची सविस्तर चौकशी अद्याप सुरू असून, तपासादरम्यान नवीन माहिती किंवा पुरावा समोर आल्यास त्यानुसार कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
सोशल मीडियावर अप्रमाणित माहिती वेगाने प्रसारित झाल्याने नागरिकांमध्ये विनाकारण भीती आणि गैरसमज निर्माण होऊ शकतात. त्यामुळे अशा प्रकारच्या रील, ऑडिओ क्लिप किंवा मेसेजवर विश्वास ठेवू नये आणि खातरजमा न करता ते पुढे प्रसारित करू नयेत, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.
तसेच, कोणतीही वास्तविक घटना किंवा संशयास्पद बाब निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. अफवा पसरवणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.




