मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune Police Iron Man | पोलिसांच्या पाठीशी कणखर भूमिका घेणारे 'लोहपुरुष' पोलीस आयुक्त अमितेश कुमार

पोलीस आयुक्तांच्या कणखर भूमिकेने पुणे पोलीस दलात नवचैतन्य

M
mubarak

2 मिनिट वाचन

pune police iron man, pune crime news

  • पोलीस आयुक्तांच्या कणखर भूमिकेने पुणे पोलीस दलात नवचैतन्य
  • पुणे, दि. ७ ऑगस्ट, महाराष्ट्र मिरर
    मुबारक जिनेरी
    | Pune Crime News, Pune Police, Pune Police Iron Man

    राजकीय दबाव, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा घेराव, आमदार सामाजिक कार्यकर्ते ठाण मांडून पोलिसांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी पोलीस आयुक्तालयात 'प्रेशर' निर्माण करीत असताना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कणखर 'लोहपुरुष' भूमिका घेत पुणे पोलिसांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे दाखवून दिले. प्रथमच मोठ्या राजकीय दबावाला बळी न पडता पोलिसांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे 'धाडस' पुण्याच्या इतिसाहत बघायला मिळाले. 'लोहपुरुष' अमितेश कुमार यांच्या कणखर भूमिकेने पुणे पोलीस दलाला स्फुर्ती मिळाली आहे. Pune Crime News, Pune Police Iron Man

    पोलिसांच्या चुकीला माफी नाही पण पोलिसांवर अन्याय देखील होऊ द्यायचा नाही अशी सडेतोड भूमिका पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिली आहे.

    स्पेशल @६५ राबविणारे पोलीस आयुक्त…

    पुणे शहरात बोकाळलेल्या अवैध धंद्यांना खतपाणी घालणाऱ्या स्पेशल @६५ चा बिमोड करून पोलिसांना त्यांच्या कर्तव्य आणि निष्ठेची जाण पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी करून दिली. अवैध धंदे रोखण्यासाठी पोलीस दलात मोठे फेरबदल पोलीस आयुक्तांनी केले. पारदर्शक, स्वच्छ कारभारासाठी पुणे पोलीस आयुक्त म्हणून जनमानसात त्यांची ख्याती निर्माण झाली आहे.

    पोलीस मक्तेदारी मोडून सर्व सामान्यांना न्याय…

    एकाच ठिकाणी वर्षानुवर्षे राहून मक्तेदारी निर्माण करणाऱ्या खात्यातील वृत्तीचा पोलीस आयुक्तांनी बंदोबस्त करून सर्व सामान्यांना न्याय दिला आहे. पोलीस आयुक्तांचे निर्णय पुणे पोलीस दलासाठी दुरोगामी फायदेशीर ठरणार आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची 'संगीतखुर्ची' हा याचाच एक भाग आहे.

    चुकीला माफी नाही पण पोलिसांवर अन्याय देखील होऊ द्यायचा नाही..

    कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलीस दल कटिबद्ध असताना अन्यायाला सर्मथन, प्रोत्साहन देणाऱ्या, चुकीचे काम करणाऱ्या पोलिसांविरुद्ध पोलीस आयुक्तांनी कडक पाऊले नेहमीच उचलली आहेत. पोर्शे कार अपघात बिल्डर विशाल अगरवाल याच्या प्रकरणात दोषी असणाऱ्या पोलिसांवर आयुक्तांनी कारवाई केलीच आहे. त्याचपद्धतीने पोलिसांवर अन्याय देखील होऊ द्यायचा नाही अशी भूमिका देखील धाडसीपणे निभावलेली आहे.

    पुणे शहराला व पुणे पोलीस दलाला अशा 'लोहपुरुष' पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची गरज आहे. न्याय, कर्तव्य, कायदा व सुव्यवस्था, पारदर्शकपणा याचे मुर्तिमंद प्रतीक पोलीस आयुक्त अमितेश कुमार ठरत आहेत.

    हेही वाचा: Pune Breaking News : पुणे मनपा आयुक्तांच्या बंगल्यातून मौल्यवान वस्तू गायब; मनसे आक्रमक

    शेअर करा