मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Priyanka Gandhi : 'इंडिया' आघाडीचे खासदार अटकेत; प्रियंका गांधी यांचा सरकारवर हल्लाबोल

•'वोट चोरी'च्या विरोधात निवडणूक आयोगाकडे जात असताना कारवाई

V
Vivek

1 मिनिट वाचन

Priyanka Gandhi : 'इंडिया' आघाडीचे खासदार अटकेत; प्रियंका गांधी यांचा सरकारवर हल्लाबोल

•'वोट चोरी'च्या विरोधात निवडणूक आयोगाकडे जात असताना कारवाई

ANI :- विशेष मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेतील अनियमिततेच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे जात असताना 'इंडिया' आघाडीच्या अनेक खासदारांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा, सपाच्या डिंपल यादव आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांच्यासह सुमारे 300 खासदारांना संसद मार्ग पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

या घटनेनंतर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी सरकारवर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या, "देशभरात होत असलेल्या 'वोट चोरी'च्या विरोधात आम्ही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी जात होतो, पण आम्हाला ताब्यात घेण्यात आले. नरेंद्र मोदी यांचे भित्रे सरकार जनतेचा आणि विरोधकांचा आवाज दाबून टाकू इच्छिते. मात्र, आम्ही घाबरणार नाही, मागे हटणार नाही. जनतेच्या अधिकारांवरील प्रत्येक हल्ल्याचा आम्ही सामना करू."

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. "हा निवडणूक आयोगाचाच डेटा आहे, माझा नाही की मी त्यावर प्रतिज्ञापत्रक द्यावे. हा डेटा त्यांनी आपल्या वेबसाईटवर टाकावा, म्हणजे सगळ्यांना सत्य समजेल. हे केवळ बंगळूरमध्येच नाही, तर अनेक ठिकाणी घडले आहे." राहुल गांधी पुढे म्हणाले, "निवडणूक आयोगाला माहीत आहे की त्यांचा डेटा उघड होईल. ते जे लपवण्याचा प्रयत्न करत आहेत, ते आम्ही बाहेर काढणारच," असा इशारा त्यांनी दिला.

फोटो गॅलरी

छायाचित्रे · 1/15

Arrow Keys ⟵ ⟶
शेअर करा