मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Kandivali Crime News : कांदिवलीतून तरुणाचे अपहरण करून 1 लाखाची खंडणी मागणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 2 आरोपी अटकेत

•छेडछाडीच्या आरोपावरून तरुणाचे अपहरण, मारहाण; समता नगर पोलिसांची यशस्वी कारवाई

V
Vivek

1 मिनिट वाचन

Thane Crime News

•छेडछाडीच्या आरोपावरून तरुणाचे अपहरण, मारहाण; समता नगर पोलिसांची यशस्वी कारवाई

मुंबई :- कांदिवली येथील 27 वर्षीय तरुणाचे अपहरण करून त्याच्या कुटुंबीयांकडून एक लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोन आरोपींना समता नगर पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी तातडीने केलेल्या कारवाईमुळे अपहृत तरुणाची सुखरूप सुटका करण्यात आली. आरोपींनी तरुणाला डांबून ठेवून त्याला मारहाण केल्याचेही उघड झाले आहे. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर सात आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

कांदिवली पूर्व येथील पोयसर परिसरात राहणाऱ्या या 27 वर्षीय तरुणाचे शुक्रवारी बिहार टेकडी परिसरातून अपहरण करण्यात आले होते. आरोपींनी या तरुणाने एका मुलीची छेड काढल्याचा आरोप करत त्याचे अपहरण केल्याचे सांगितले. या घटनेनंतर आरोपींनी तरुणाच्या पत्नीला फोन करून "तुमच्या पतीने एका मुलीची छेड काढली आहे. त्याचा मृतदेह पाहायचा नसेल, तर एक लाख रुपये खंडणी द्यावी लागेल," अशी धमकी दिली. आरोपींनी महिलेसोबत गैरवर्तन करत तिला शिवीगाळही केली.

या प्रकाराने घाबरलेल्या पत्नीने तात्काळ समता नगर पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ गुन्हा दाखल केला आणि एक पथक पोयसर परिसरात रवाना केले. या पथकाने तरुणाचा शोध घेत त्याला सुखरूप सोडवले. त्याचवेळी पोलिसांनी आदित्य दरेकर (वय 24) आणि शब्बीर अब्दुल रेहमान खाल (वय 23) या दोन आरोपींना अटक केली.

पोलिसांनी सांगितले की, अपहरण केलेल्या तरुणाला आरोपींनी मारहाण केली होती. त्याची वैद्यकीय तपासणी केली असता त्याला कोणत्याही गंभीर जखमा झाल्या नसल्याचे निष्पन्न झाले. तरुणाने दिलेल्या माहितीनुसार, या गुन्ह्यात एकूण सात ते आठ जण सहभागी होते. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींवर खंडणी, अपहरण, मारहाण आणि धमकावण्यासारखे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी मालाड आणि कांदिवली परिसरातील रहिवासी असून, त्यांच्याविरोधात यापूर्वी कोणताही गुन्हा दाखल नाही. या प्रकरणातील उर्वरित आरोपींचा पोलीस कसून शोध घेत आहेत. तरुणाला त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले असून, आरोपींची पुढील चौकशी सुरू आहे.

हेही वाचा: Panvel News : पनवेल पोलिसांची गुन्हेगारांवर धडक कारवाई: ७४ लाखांचा मुद्देमाल जप्त, ५७ आरोपींना अटक!

शेअर करा